ब्रेकिंग न्यूज
चंद्रभागा स्वच्छतेसाठी गुरुदेव भक्तांचे श्रमदान; ११ वर्षांची अखंड सेवा परंपरा कायम “तुमची त्या प्रकरणात निर्दोष सुटका कशी, निकाल वाचून दाखवू का?” रमेश म्हात्रेंना हायकोर्टाचा सणसणीत टोला! Who is Sharmila dhankhar : हुंड्यासाठी छळ, नवऱ्यानं घराबाहेर काढलं; आयुष्य संपवायला निघालेल्या पोरीनं भारता… आईवडील पंढरीला गेले, मागे विवाहित तरुणाने नको ते केले, विहिरीकाठचे दृश्य पाहून सगळेच हादरले, सोलापुरात खळबळ… ACB: चंद्रपुरात ACB चा धडाका! २० हजारांची लाच घेताना दोन अधिकारी रंगेहात सापडले Success Story : शेतीमधून भागत नव्हता खर्च, शामद यांनी घेतला पोल्ट्री व्यवसायाचा निर्णय, वर्षाला 12 लाख नफा गुरुपौर्णिमेनिमित्त साई मित्र परिवाराचा १७ वा रक्तदान महायज्ञ,श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संगम; रक्तदान शिबिर, महाप्रसाद व भव्य शोभायात्रेचे आयोजन Pune Rain: पुणेकरांनो सावधान! पुढील 2 दिवस ‘ऑरेंज अलर्ट’; ‘या’ ठिकाणी जाणं टाळाच, हवामान विभागाचा इशारा Mirabai Chanu : गळ्यात चमकणारं ‘गोल्ड मेडल’ अन् राष्ट्रगीत कानावर पडताच डोळ्यातून घळाघळा पाणी, गोल्डन स्टार… ‘ईव्ही’ गाड्यांची डीलरशिप घ्यायला गेला, बांधकाम व्यावसायिक एका चुकीत फसला, शेवटी…, नाशिकमध्ये काय घडलं?
SP News Maregaon

Who is Sharmila dhankhar : हुंड्यासाठी छळ, नवऱ्यानं घराबाहेर काढलं; आयुष्य संपवायला निघालेल्या पोरीनं भारता…

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Who is Sharmila Dhankar Win Gold Medal In CWG : प्रत्येकाच्या आयुष्याशी संघर्ष जोडलेला आहे. कुणाचं दु:ख मोठं तर कुणाचं लहान… पण यातून उभा राहून आयुष्य सावरणाराच ठरतो खऱ्या आयुष्याचा हिरो… सध्या सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये अनेक खरे हिरो समोर येत आहेत. या कॉमनवेल्थ गेमचा पाचवा दिवस भारतासाठी खास राहिला. यामध्ये शर्मिला धनकरने देशाची पहिली पॅरा-ॲथलेटिक्स सुवर्णपदक विजेती ठरून इतिहास रचला. शर्मिलाने महिलांच्या F57 शॉट पुट (गोळाफेक) प्रकारात 9.81 मीटरचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो करत सुवर्णपदक पटकावलं. पण शर्मिला धनकरचा प्रवास वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
वयाच्या 18 व्या वर्षीच लग्न झालं अन्…
शर्मिला धनखर यांचा जन्म 15 ऑगस्ट 1986 रोजी झाला आणि हरियाणातील रेवाडी इथं त्यांचं बालपण गेलं. वयाच्या दुसऱ्याच वर्षी शार्मिलाला पोलिओची लागण झाली. त्यामुळे त्यांना अपंगत्वाच्या समस्येला सामोरं जावं लागलं. त्याच घरात गरिबी… आई आंधळी असल्याने शर्मिलाला लहानपणापासून संघर्ष कराव लागला. वडिलांच्या जीवावर घरदार चालत होतं. वयाच्या 18 व्या वर्षीच लग्न झालं अन् मोठी जबाबदारी खांद्यावर आली. गरीब कुटुंबातील शर्मिलाला अनेक वर्षे हुंड्यासाठी छळ सहन करावा लागला.

 Historic Moment  #IndiaAtCWG
Sharmila Dhankar wins Gold in Women’s Shot Put F57 & creates history at #CWG2026. She becomes India’s first-ever Commonwealth Games Gold medallist in Para Athletics. #TeamIndia
pic.twitter.com/RsDnUHUiU7

— All India Radio News (@airnewsalerts) July 28, 2026

हुंड्यासाछी छळ, नवऱ्याची मारहाण…
शर्मिलाला कौटुंबिक हिंसाचाराचाही सामना करावा लागला. नवऱ्याची मारहाण सहन करावी लागायची. अखेर वयाच्या 26 व्या वर्षी तिच्या पहिल्या पतीने तिला घरातून हाकलून दिलं. कडेवर दोन पोरी घेऊन माहेरी निघून आली अन् सर्वात कठीण काळ सुरू झाला. दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या शर्मिलाने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला पण शेवटी हिंमत झाली नाही. तिने पुन्हा भरारी घेतली अन् लोकांच्या घरात आया म्हणून काम करून लागली. लोकांची पोरं सांभाळण्याचे तिला पैसे मिळू लागले अन् तिने नव्या जोशाने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 28 व्या वर्षी तिने पुनर्विवाह केला अन् नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे तिने खेळाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

Who is Esha Singh : कोण आहे ईशा सिंग? वडील ड्राईव्हर, 21 वर्षांच्या पोरीनं गोल्ड मेडल पटकावलं; ऑलिम्पिक स्टार मनू भाकरला कांस्यपदक!
दुसऱ्या नवऱ्याने पाठिंबा दिला अन्…
दुसर्‍या नवऱ्याकडून म्हणजेच अजित सिंगकडून प्रचंड पाठिंबा मिळाला. पॅरा-ॲथलेटिक्समध्ये करिअर करण्याचं धाडस तिला नवऱ्याकडून मिळालं. राव तुलाराम स्टेडियममध्ये पोहोचली, जिथं टेकचंद यांच्याकडून तिला प्रशिक्षण मिळालं. टेकचंद हे भारतासाठी कामगिरी केले खेळाडू होते. त्यानंतर शर्मिलाने धाडस दाखवलं अन् गोळाफेकमध्ये पहिला प्रयत्न केला. पहिल्याच प्रयत्नात शर्मिलाने 5 मीटर लांब गोळा फेकला. तेव्हा नॅशनल रेकॉर्ड 6 मीटरचा होता. तिथून तिने मागे वळून पाहिलं नाही अन् आज पोरीनं भारतासाठी गोल्ड मेडल पटकावलं.

EXCLUSIVE: "I want to dedicate this medal to my mother. She had to listen a lot. This is a slap to all the doubters" – Sharmila Dhankhar’s emotional and heartfelt reaction after winning Commonwealth Games Gold Medal. @TataSteelLtd @WeAreTeamIndia @BoriaMajumdar #CWG2026 pic.twitter.com/P2pO3dFTp4
— RevSportz Global (@RevSportzGlobal) July 27, 2026

विजयानंतर काय म्हणाली शर्मिला?
मला हे पदक माझ्या आईला समर्पित करायचं आहे. तिला खूप काही ऐकून घ्यावं लागलं होतं. ज्यांनी माझ्या क्षमतेवर शंका घेतली, त्यांना हे एक चपराक आहे" – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर शर्मिला धनखड यांची भावूक प्रतिक्रिया दिली. मला कोणतंही सेलीब्रेशन करायचं आहे. माझे वडील एशियन गेम्सच्या आधी वारले होते, हा विजय त्यांच्यासाठी आहे, असंही शर्मिला धनकर म्हणाल्या.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर