ब्रेकिंग न्यूज
⚡ लंडनमध्ये असल्याचं भासवलं अन् गुपचूप पुण्यात आली, मुग्धा फ्लॅटवर काय करत होती? कुटुंबापासून लपवलं सिक्रेट, … ✦ ⚡ चार महिन्यांची गर्भवती, पती माहेरी भेटायला आला अन् मध्यरात्रीच नको ते घडलं, छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ ✦ ⚡ PM Kisan: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! आज खात्यावर जमा होणार 2000 रुपये ✦ ⚡ सतीश चव्हाण हरले, आपलं कसं होणार? काळेंची धडधड वाढली, राष्ट्रवादीत धुसफूस, मराठवाड्यात काय घडतंय? ✦ ⚡ Neeraj Yadav Death : ‘गोल्ड मेडलिस्ट’ नीरज यादव मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! स्कॉर्पिओ कार अन् महिलेची एन्ट… ✦ ⚡ तुरीच्या शेतीत चक्क गांजाची लागवड, छ. संभाजीनगरात मोठी कारवाई, 141 झाडे जप्त ✦ ⚡ प्रवाशाच्या पायातील स्पोर्ट्स शूज बघून आला संशय; सोल कापताच अधिकारीही चक्रावले, पुणे विमानतळावर विचित्र घटन… ✦ ⚡ AUS vs SA : ‘सँडपेपर देऊ का?’, आफ्रिकन फॅन्सने ऑस्ट्रेलियाच्या जखमेवर मीठ चोळलं, नेमकं काय घडलं? VIDEO ✦ ⚡ दुष्काळाची दाहकता, जनावरांच्या चाऱ्यासाठीही पैसे नाहीत, सोलापूरच्या शेतकऱ्यावर पत्नीचे दागिने गहाण ठेवण्याच… ✦ ⚡ मासिक पाळीचं नाटक, नवरा बाहेर जाताच नवरीने डाव सांधला, कांड पाहून सगळेच चक्रावले
SP News Maregaon

सतीश चव्हाण हरले, आपलं कसं होणार? काळेंची धडधड वाढली, राष्ट्रवादीत धुसफूस, मराठवाड्यात काय घडतंय?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेच्या पुणे आणि मराठवाडा पदवीधर अशा दोन जागा सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असताना भाजपसाठी एक जागा सोडावी लागली तर दुसऱ्या जागेवर सतीश चव्हाण यांचा पराभव झाल्याने निवडणुकीत राष्ट्रवादीला जबर धक्का बसला. याउलट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दोन जागा लढवून दोन्ही जागांवर विजय मिळवल्याने पक्षाला उभारी मिळून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सतीश चव्हाण यांचा पराभव झाल्याने शिक्षक आमदार विक्रम काळे यांची धडधड वाढली आहे. कारण पुढील दोन तीन महिन्यांत होणाऱ्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला त्यांना सामोरे जायचे आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. सत्ताधारी महायुतीला या निवडणुकीत जोरदार फटका बसला. पाच जागांपैकी दोन जागांवरच त्यांना विजय मिळवता आला. महायुतीत विशेषत: राष्ट्रवादीला जबर धक्का बसला. पक्षनेतृत्वाने पुण्याची जागा भाजपसाठी सोडून दिली तर छत्रपती संभाजीनगरची जागा पक्षाने हरली. त्यामुळे राष्ट्रवादीची पाटी कोरी राहिली.
सतीश चव्हाण यांचा चौकार हुकला
सतीश चव्हाण हे राष्ट्रवादीचे तीन टर्मचे आमदार. यावेळी चौकार मारणारच अशा थाटातच ते निवडणुकीला उभे राहिले होते. परंतु गेल्या तीन टर्ममध्ये पदवीधरांसाठी काम न केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. मतदारसंघात त्यांच्याविषयी कमालीचा रोष होता. तसेच महायुतीतील घटक पक्षांपैकी कुणी उघड तर कुणी छुपा विरोध त्यांना केलेला होता. त्यामुळे सतीश चव्हाण डेंजर झोनमध्ये राहतील, अशी कुजबुज सुरूच होती. अपेक्षेप्रमाणे निवडणुकीत सतीश चव्हाण यांना धक्का बसला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनी चव्हाण यांच्यावर मात करून विधान भवनात पाऊल ठेवले.
पराभव चव्हाणांचा, इकडे विक्रम काळेंची धडधड वाढली
सतीश चव्हाण यांचा जरी पराभव झालेला असला तरी इकडे राष्ट्रवादीचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांची धडधड वाढली आहे. येत्या दोन महिन्यांनी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. विक्रम काळे यांनाच राष्ट्रवादी पुन्हा मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आमदार विक्रम काळे हेही शिक्षक मतदारसंघातून तीन वेळा विजयी झाले आहेत. परंतु मतदार जसे सतीश चव्हाण यांच्यावर नाराज होते, तसेच विक्रम काळे यांच्या कार्यशैलीवरही नाराज आहेत. त्यामुळे काळे यांच्यासमोर निवडणुकीला उभे राहण्यासाठी निवडणूक जिंकण्यापर्यंतचे आव्हान असणार आहे.
राष्ट्रवादीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये कसा पराभव झाला?
सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीविषयी पक्षात कोणतीच चर्चा झाली नव्हती. त्यांना उमेदवारी द्यावी की नाही, याबद्दल देखील कुणाची मते विचारात घेतली गेली नव्हती. एकूणच पक्षात संवादाचा अभाव होता, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. दुसरीकडे चव्हाण यांच्या कामावर मतदार नाराज असल्याने त्याचा फटकाही त्यांना बसला, असे सांगितले जाते.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर