ब्रेकिंग न्यूज
⚡ लंडनमध्ये असल्याचं भासवलं अन् गुपचूप पुण्यात आली, मुग्धा फ्लॅटवर काय करत होती? कुटुंबापासून लपवलं सिक्रेट, … ✦ ⚡ चार महिन्यांची गर्भवती, पती माहेरी भेटायला आला अन् मध्यरात्रीच नको ते घडलं, छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ ✦ ⚡ PM Kisan: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! आज खात्यावर जमा होणार 2000 रुपये ✦ ⚡ सतीश चव्हाण हरले, आपलं कसं होणार? काळेंची धडधड वाढली, राष्ट्रवादीत धुसफूस, मराठवाड्यात काय घडतंय? ✦ ⚡ Neeraj Yadav Death : ‘गोल्ड मेडलिस्ट’ नीरज यादव मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! स्कॉर्पिओ कार अन् महिलेची एन्ट… ✦ ⚡ तुरीच्या शेतीत चक्क गांजाची लागवड, छ. संभाजीनगरात मोठी कारवाई, 141 झाडे जप्त ✦ ⚡ प्रवाशाच्या पायातील स्पोर्ट्स शूज बघून आला संशय; सोल कापताच अधिकारीही चक्रावले, पुणे विमानतळावर विचित्र घटन… ✦ ⚡ AUS vs SA : ‘सँडपेपर देऊ का?’, आफ्रिकन फॅन्सने ऑस्ट्रेलियाच्या जखमेवर मीठ चोळलं, नेमकं काय घडलं? VIDEO ✦ ⚡ दुष्काळाची दाहकता, जनावरांच्या चाऱ्यासाठीही पैसे नाहीत, सोलापूरच्या शेतकऱ्यावर पत्नीचे दागिने गहाण ठेवण्याच… ✦ ⚡ मासिक पाळीचं नाटक, नवरा बाहेर जाताच नवरीने डाव सांधला, कांड पाहून सगळेच चक्रावले
SP News Maregaon

PM Kisan: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! आज खात्यावर जमा होणार 2000 रुपये

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


PM Kisan: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा बहुप्रतिक्षित २४ वा हप्ता आज, ३० ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे. या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २,००० रुपये थेट हस्तांतरित केले जातील. सणासुदीच्या काळात मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे शेतकरी कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या २४ व्या हप्त्याअंतर्गत केंद्र सरकार तब्बल ९.३४ कोटी शेतकऱ्यांना एकूण १८,६८० कोटी रुपयांचा निधी वितरीत करणार आहे.

ही अट पूर्ण केली नाही तर मिळणार नाहीत पैसे
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, फक्त नोंदणी झाली म्हणून प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा होतीलच असे नाही. तीनपैकी कोणतीही एक अट अपूर्ण असल्यास तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो. पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. शेतकरी अधिकृत पोर्टलवरून ओटीपीद्वारे किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिकद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेले असणे आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सेवा सुरू असणे आवश्यक आहे. बँक तपशिलात तफावत असल्यास पैसे जमा होणार नाहीत. जमीन पडताळणी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी पूर्ण असणे गरजेचे आहे. स्टेटसमध्ये ‘Land Seeding’ पर्याय अपूर्ण दिसत असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा.

घरबसल्या असे तपासा तुमचे स्टेटस
१. पीएम किसानच्या अधिकृत pmkisan.gov.in वेबसाइटला भेट द्या.
२. ‘Farmers Corner’ या विभागात जा.
३. तेथे ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करा.
४. तुमचा नोंदणी क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
५. ओटीपी व्हेरिफिकेशन पूर्ण केल्यानंतर स्क्रीनवर तुमच्या २४ व्या हप्त्याचे आणि पात्रतेचे स्टेटस स्पष्ट दिसेल.

योजनेअंतर्गत मिळतात वर्षाला ६,००० रुपये
२०१८ मध्ये सुरू झालेली ‘पीएम किसान’ ही केंद्र सरकारची एक प्रमुख योजना आहे. याद्वारे पात्र शेतकरी कुटुंबांना शेतीचे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी दरवर्षी ६,००० रुपयांची मदत ३ समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी २,००० रुपये) थेट बँक खात्यात दिली जाते. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्रिमंडळाने जुलै महिन्यात या योजनेला २०२६-२७ ते २०३०-३१ पर्यंत पुढील ५ वर्षांसाठी मुदतवाढ दिली असून, यासाठी ३.१५ लाख कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी दिली आहे. जून २०२६ पर्यंत २३ हप्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात ४.४७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर