ब्रेकिंग न्यूज
⚡ लंडनमध्ये असल्याचं भासवलं अन् गुपचूप पुण्यात आली, मुग्धा फ्लॅटवर काय करत होती? कुटुंबापासून लपवलं सिक्रेट, … ✦ ⚡ चार महिन्यांची गर्भवती, पती माहेरी भेटायला आला अन् मध्यरात्रीच नको ते घडलं, छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ ✦ ⚡ PM Kisan: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! आज खात्यावर जमा होणार 2000 रुपये ✦ ⚡ सतीश चव्हाण हरले, आपलं कसं होणार? काळेंची धडधड वाढली, राष्ट्रवादीत धुसफूस, मराठवाड्यात काय घडतंय? ✦ ⚡ Neeraj Yadav Death : ‘गोल्ड मेडलिस्ट’ नीरज यादव मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! स्कॉर्पिओ कार अन् महिलेची एन्ट… ✦ ⚡ तुरीच्या शेतीत चक्क गांजाची लागवड, छ. संभाजीनगरात मोठी कारवाई, 141 झाडे जप्त ✦ ⚡ प्रवाशाच्या पायातील स्पोर्ट्स शूज बघून आला संशय; सोल कापताच अधिकारीही चक्रावले, पुणे विमानतळावर विचित्र घटन… ✦ ⚡ AUS vs SA : ‘सँडपेपर देऊ का?’, आफ्रिकन फॅन्सने ऑस्ट्रेलियाच्या जखमेवर मीठ चोळलं, नेमकं काय घडलं? VIDEO ✦ ⚡ दुष्काळाची दाहकता, जनावरांच्या चाऱ्यासाठीही पैसे नाहीत, सोलापूरच्या शेतकऱ्यावर पत्नीचे दागिने गहाण ठेवण्याच… ✦ ⚡ मासिक पाळीचं नाटक, नवरा बाहेर जाताच नवरीने डाव सांधला, कांड पाहून सगळेच चक्रावले
SP News Maregaon

तुरीच्या शेतीत चक्क गांजाची लागवड, छ. संभाजीनगरात मोठी कारवाई, 141 झाडे जप्त

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर: तुरीच्या शेतात गांजा लागवड करून शेतकऱ्याचा बक्कळ कमाईचा डाव फसला. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील लालवन शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई केली. यामध्ये गांजाची १ क्विंटल ५ किलो वजनाची १४१ झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी ६६ वर्षीय चैनसिंग रतनसिंग बिमरोटे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून ५२ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांमार्फत ताब्यात घेण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात फुलंब्री तालुक्यातील लालवन शिवारात शेतकऱ्याने तुरीच्या शेतात गांजाची लागवड केली होती. पाडळी एकफाटा शिवारातील गट क्रमांक २८ मध्ये गांजाची लागवड झाल्याची माहिती पिशोर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी थेट कारवाई करत गांजा शेतीचा भांडाफोड केला. तेव्हा शेतात गांजाची १४१ झाडे आढळली.

पतीसोबत वाद, विवाहितेनं रागानं घर सोडलं, त्यानं रात्री रिक्षात बसवलं अन् पहाटे…, भयंकर कृत्यानं छ. संभाजीनगर हादरलं!

पोलिसांनी ५२ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा एक क्विंटल ५ किलोचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ६६ वर्षीय चैनसिंग रतनसिंग बिमरोटे यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ अर्थात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर