ब्रेकिंग न्यूज
⚡ लंडनमध्ये असल्याचं भासवलं अन् गुपचूप पुण्यात आली, मुग्धा फ्लॅटवर काय करत होती? कुटुंबापासून लपवलं सिक्रेट, … ✦ ⚡ चार महिन्यांची गर्भवती, पती माहेरी भेटायला आला अन् मध्यरात्रीच नको ते घडलं, छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ ✦ ⚡ PM Kisan: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! आज खात्यावर जमा होणार 2000 रुपये ✦ ⚡ सतीश चव्हाण हरले, आपलं कसं होणार? काळेंची धडधड वाढली, राष्ट्रवादीत धुसफूस, मराठवाड्यात काय घडतंय? ✦ ⚡ Neeraj Yadav Death : ‘गोल्ड मेडलिस्ट’ नीरज यादव मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! स्कॉर्पिओ कार अन् महिलेची एन्ट… ✦ ⚡ तुरीच्या शेतीत चक्क गांजाची लागवड, छ. संभाजीनगरात मोठी कारवाई, 141 झाडे जप्त ✦ ⚡ प्रवाशाच्या पायातील स्पोर्ट्स शूज बघून आला संशय; सोल कापताच अधिकारीही चक्रावले, पुणे विमानतळावर विचित्र घटन… ✦ ⚡ AUS vs SA : ‘सँडपेपर देऊ का?’, आफ्रिकन फॅन्सने ऑस्ट्रेलियाच्या जखमेवर मीठ चोळलं, नेमकं काय घडलं? VIDEO ✦ ⚡ दुष्काळाची दाहकता, जनावरांच्या चाऱ्यासाठीही पैसे नाहीत, सोलापूरच्या शेतकऱ्यावर पत्नीचे दागिने गहाण ठेवण्याच… ✦ ⚡ मासिक पाळीचं नाटक, नवरा बाहेर जाताच नवरीने डाव सांधला, कांड पाहून सगळेच चक्रावले
SP News Maregaon

प्रवाशाच्या पायातील स्पोर्ट्स शूज बघून आला संशय; सोल कापताच अधिकारीही चक्रावले, पुणे विमानतळावर विचित्र घटन…

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक अतिशय धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. यात विमानतळावर प्रवाशांच्या सामानाची तपासणी सुरु होती. दरम्यान अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बँकॉकहून आलेल्या भारतीय प्रवाशाच्या बॅगचीही तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळलं नाही. पण या प्रवाशाच्या पायातील स्पोर्ट्स शूज बघताच अधिकाऱ्यांना संशय आला. शेवटी या शूजचे सोल कापताच धक्कादायक खुलासा झाला.

काय घडलं?

सीमाशुल्क अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली होती. यासोबतच प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं या निरीक्षणातून ही तपासणी करण्यात आली. बँकॉकहून एयर इंडिया एक्सप्रेसच्या आयएक्स-२९१ या विमानाने आलेल्या प्रवाशाची अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्याच्या सामानात सुरुवातीला काहीही संशयास्पद आढळलं नाही. मात्र, त्याने घातलेल्या काळ्या स्पोर्ट्स शूजकडे बघताच संशय आला. त्याच्या पायातील शूजचं वजन आणि सोलची जाडी संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी बुटांची बारकाईने तपासणी केली. बुटांचे सोल कापून तपासणी केली असता, त्यामध्ये खास कप्पे तयार करून पॅकेट्स लपवल्याचे आढळले.

प्रवाशाने स्पोर्ट्स शूजच्या सोलमध्ये अंमलीपदार्थ लपवला होता. या कारवाईत ३८९.२७ ग्रॅम हशिश जप्त करण्यात आले, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे १३ लाख ५० हजार रुपये आहे. याप्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, प्रवाशानं वापरलेली ही पद्धत पाहून अधिकारीही चक्रावून गेले.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर