ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

नागपुरात वायुदल जवानाच्या पत्नीवर सामूहिक अत्याचार:धर्मांतराचा प्रयत्न, मध्य प्रदेशात नेऊन निकाह लावण्याचा प्रयत्न, खंडणी उकळल्याचेही उघड

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हवाई दलातील जवानाच्या रिअल इस्टेट व्यावसायिक पत्नीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून तिला तब्बल एक वर्ष ब्लॅकमेल करत तिच्याकडून ३ लाख ९ हजार खंडणी उकळली. तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणून मध्य प्रदेशात नेऊन निकाह लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली. अय्याज ताज मदारे आणि अमिन शेख अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींवर नवीन भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत सामूहिक बलात्कार, खंडणी, जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न आणि “महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायदा’ नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. जमीन खरेदीसाठी मोठा ग्राहक असल्याचे सांगून पीडितेला घेतले होते विश्वासात पीडिता रिअल इस्टेटचा व्यवसाय करते. तिचा पती हवाई दलात कार्यरत आहे. २०२५ मध्ये अय्याज ताज मदारेने जमीन खरेदीसाठी चांगला ग्राहक असल्याचे सांगून तिला विश्वासात घेतले. अय्याजने तिला नागपुरातील वर्धा रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावले. हॉटेलमध्ये आरोपीने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजले. नंतर अय्याज आणि त्याचा सहकारी अमिन शेखने तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला आणि मोबाइलमध्ये त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. काय आहे कायद्यात शिक्षेची तरतूद? महाराष्ट्रात ‘जादूटोणा विरोधी कायदा (२०१३)’ नुसार दोषीला किमान ६ महिने ते कमाल ७ वर्षांपर्यंतच्या कारावासाची व ५,००० ते ५०,००० रु.पर्यंत दंडाची तरतूद आहे. सामूहिक बलात्कारात दोषीला किमान २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा किंवा जन्मठेप होऊ शकते. मध्य प्रदेशातील फरार मौलानाचा शोध सुरू या प्रकरणातील तिसरा आरोपी तथा पीडितेचा निकाह लावून देण्याचा प्रयत्न करणारा मध्य प्रदेशातील तामिया येथील मौलाना पसार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे एक विशेष तपास पथक छिंदवाडा आणि तामिया परिसराकडे रवाना केले आहे. व्हायरल झालेला जादूटोण्याचा व्हिडिओ नेमका कोणी शूट केला आणि तो कोणी लिक केला, याचाही शोध सायबर सेल घेत आहे. आरोपींनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि पतीला सांगण्याची धमकी देऊन वर्षभर तिच्यावर वारंवार सामूहिक अत्याचार केला. बदनामीच्या भीतीने पीडितेने आरोपींना वेळोवेळी एकूण ३ लाख ९ हजार रुपयांची खंडणी दिली. मात्र, आरोपींची हाव एवढ्यावरच थांबली नाही; त्यांनी पीडितेवर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. या कटात मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील तामिया येथील एका मौलानाव्दारे तिला बळजबरीने धर्म बदलण्यास भाग पाडून तिचा निकाह लावण्याचाही प्रयत्न केला. याच काळात मुख्य आरोपी अय्याज मदारे एका बंद खोलीत उर्दू भाषेत काही अघोरी मंत्र पुटपुटून पीडितेवर जादूटोणा व वशीकरण करत असल्याचा व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (दिव्य मराठी याची पुष्टी करत नाही)

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर