ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

*संपादक कोटबंकर हल्ला प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करा*

66 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

*ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव ची मागणी*

*ठाणेदार मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन*

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव:- संपादक रवींद्र कोटबंकर यांचेवर समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा, ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.व हल्लेखोरांवर कडक कारवाई करा.या प्रमुख मागणीसाठी ठाणेदार मारेगाव मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.

वर्धा येथील जेष्ठ पत्रकार, संपादक रवींद्र कोटबंकर यांचेवर काही समाजकंटकांनी प्राण घातक हल्ला करुन त्यांना जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला.ही घटना अतिशय निंदनीय असुन लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभावर हा घाला असुन लोकशाहीची मुस्कटदाबी आहे.या घटनेतील आरोपीवर कारवाई होणे अपेक्षित आहे.अश्या कृत्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे.या घटनेचा मारेगाव येथे जाहीर निषेध करण्यात आला. व घटनेतील आरोपीवर कडक कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव च्या वतीने ठाणेदार मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष देवेंद्र पोल्हे,ज्योतिबा पोटे,सुरेश नाखले,नागेश रायपुरे, उमर शरीफ,अशोक कोरडे,माणिक कांबळे,भास्कर धानफुलें, श्रीधर सिडाम,रमेश झिंगरे,दिलदार शेख,मोरेश्वर ठाकरे,सुमित हेपट,आनंद नक्षणे, भाष्कर राऊत,सचिन मेश्राम, सुरेश पाचभाई,पंकज नेहारे,आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर