ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे : पोलीस, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांसारख्या तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्ट करण्याच्या प्रकारात पुणेकरांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला जात आहे. गेल्या 18 महिन्यांत डिजिटल अरेस्टचे तब्बल 136 गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणांत ज्येष्ठ नागरिकांची 100 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

2025 मध्ये डिजिटल अरेस्टचे 85 गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची तब्बल 53 कोटी 52 लाख रुपयांची फसवणूक झाली. यंदा जुलैअखेरपर्यंत डिजिटल अरेस्टचे 51 गुन्हे नोंदविण्यात आले असून, त्यामध्ये 46 कोटी 27 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गुन्ह्यांची संख्या कमी असली, तरी फसवणुकीची रक्कम मोठी आहे. एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 10 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती सायबर पोलिसांच्या वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिली.

अलीकडेच 82 वर्षीय सेवानिवृत्त व्यावसायिकाची 10 कोटी 74 लाख रुपये, तर 87 वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याची 3 कोटी 46 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपींनी सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून संबंधितांना मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी दिली. त्यानंतर चौकशीच्या नावाखाली मोठ्या रकमा विविध खात्यांमध्ये वर्ग करण्यास भाग पाडले.

याचप्रमाणे 74 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका आणि त्यांच्या पतीची 68 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपींनी वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून या दाम्पत्याला तब्बल महिनाभर डिजिटल अरेस्टमध्ये ठेवल्याचे तपासात समोर आले आहे.

असा होतो फसवणुकीचा प्रकार

सायबर चोरटे प्रथम फोन करून संबंधित व्यक्तीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल असल्याचे सांगतात. त्यानंतर पोलीस, सीबीआय किंवा ईडीच्या अधिकाऱ्यांच्या नावाने व्हिडिओ कॉल केला जातो. बनावट ओळखपत्रे, नोटिसा आणि कागदपत्रे दाखवून व्यक्तीवर विश्वास निर्माण केला जातो. अटकेची भीती दाखवत बँक खात्यातील रक्कम ‘तपासणीसाठी’ किंवा ‘सुरक्षित ठेवण्यासाठी’ दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यास सांगितले जाते. भीती आणि मानसिक दबावामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आरोपींच्या सांगण्यावरून लाखो-कोट्यवधी रुपये वर्ग करतात.

सायबर पोलिसांकडून अशा प्रकारचे फोन आल्यास घाबरून कोणत्याही खात्यात पैसे वर्ग करू नयेत, वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती देऊ नये आणि तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर