ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

पहापळ येथील 55 वर्षीय शेतकऱ्यांची कीटनाशक प्राशन करून आत्महत्या

122 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दि.4 जुलै 2024 रोज गुरुवारला सकाळी उघडकीस आली.त्यामुळे तालुक्यामध्ये काही दिवस थांबलेले आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरु झाल्याचे दिसत आहे.

तालुक्यातील पहापळ येथील माधवराव केशव खोके अंदाजे वय 55 वर्षे हे आपल्या कुटुंबासह पहापळ येथे राहत होते.आणि शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे.त्यांचेकडे 11 एकर शेती आहे. मागील काही वर्षांपासून त्यांच्या शेतीमध्ये पाहिजे तसे उत्पन्न होत नसल्याने ते कर्जामध्ये डुबलेले होते अशी माहिती आहे.

अशातच काल दि.3 जुलै 2024 रोज बुधवारला रात्री 8:30 वाजता ते घरून शेतातील गोठ्यात बैल व कोबड्या असल्याने जागली साठी जातो असे सांगून शेतात गेले होते.त्यांनी शेतात विषारी कीटकनाशक प्राशन केले. सकाळी कुटुंबातील काही सदस्य  शेतात गेले असता सदर घटना उघडकीस आली.

त्यांनी घटनेची माहिती लगेच मारेगाव पोलीस स्टेशनला दिली.माहिती मिळतात मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळ पंचनामा करून त्यांचा मृतदेह मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.त्याचे पश्चात आई,पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा आप्तपरिवार आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात जामदार आनंद अलचेवार करीत आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर