ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर: मनात जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर अशक्य काहीच नसतं, हेच एका युवा खेळाडूनं दाखवून दिलंय. बुलढाणा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओम काकड याने खेळ आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवलं आहे. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदकं पटकावून ‘गोल्डन बॉय’ म्हणून ओळख मिळवलेल्या ओमने आता पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट अर्थात CA ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याच्या याच कामगिरीबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.

‎लहानपणापासूनच ओमला खेळाची आवड होती. नववीत असताना त्याच्या हातात टेनिसचं रॅकेट आलं आणि त्याच्या टेनिस प्रवासाला सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्यानंतर त्याचा खेळातील आत्मविश्वास वाढला. पुढे देशातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत त्याने अनेक पदकं मिळवली. आतापर्यंत 12 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत त्याने आठ स्पर्धांमध्ये पदकं मिळवली असून, त्यात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे.

शिक्षणापासून ते रोजगारापर्यंत, सर्व मदत मिळणार एकाच ठिकाणी, शिक्षिकेने तृतीयपंथीयासाठी सुरू केलं खास अ‍ॅप, Video

खेळासोबत शिक्षणातही यश

खेळासोबतच ओमने शिक्षणातही सातत्य कायम ठेवलं. दहावीच्या परीक्षेत त्याने 95 टक्के, तर बारावीमध्ये 88 टक्के गुण मिळवले. सुरुवातीला विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा त्याचा विचार होता. मात्र, CA क्षेत्राबाबत प्रेरणा मिळाल्यानंतर त्याने वाणिज्य शाखेकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि CA परीक्षेची तयारी सुरू केली.

‎अभ्यास आणि खेळाचा ताळमेळ साधणं ओमसाठी सोपं नव्हतं. टेनिसचा सराव, स्पर्धांसाठीचा प्रवास आणि अभ्यासासाठी मोठा वेळ देत त्याने आपला दिनक्रम आखला. CAच्या तयारीच्या काळात तो दिवसाला जवळपास 15 ते 16 तास अभ्यास करत होता. त्याचवेळी टेनिसचा सरावही सुरू ठेवला. अखेर या मेहनतीचं फलित मिळालं आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने CA परीक्षा उत्तीर्ण केली.

‎ओमच्या या यशामागे त्याच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. त्याचे वडील शेतकरी असून कुटुंबाचं उत्पन्न मर्यादित होतं. टेनिसच्या सरावाचा आणि स्पर्धांचा खर्च पेलताना अनेकदा आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. काही वेळा ओमच्या खेळासाठी शेतीचा तुकडाही विकावा लागला. मात्र, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आई-वडिलांनी त्याच्या खेळात किंवा शिक्षणात कोणतीही कमतरता पडू दिली नाही.

‎आर्थिक अडचणींमुळे काही काळ ओमने खेळ सोडून केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा विचारही केला होता. मात्र, आई-वडिलांनी त्याच्यावर विश्वास ठेवत खेळ सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. ‘तू चांगली कामगिरी करू शकतोस’, असा विश्वास देत त्यांनी त्याला सातत्याने साथ दिली. ओमच्या आई अनिता काकड यांनीही मुलाच्या यशासाठी जे शक्य होतं ते करण्याचा निर्णय घेतला.

‎महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदकं जिंकून ‘गोल्डन बॉय’ म्हणून मिळवलेली ओळख आणि आता पहिल्याच प्रयत्नात CA परीक्षा उत्तीर्ण करण्याचं यश, अशी दुहेरी कामगिरी ओमने साधली आहे. राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीनंतर आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीही सज्ज असल्याचं त्याने सांगितलं आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर