ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

रानडुकरांनी तीन एकरातील तूर पीक केले फस्त

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेतकऱ्याचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी

सुरेश पाचभाई । मारेगाव

मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) शिवारातील शेतकरी ज्ञानेश्वर आनंदराव सुरतेकर यांच्या शेतातील तुरीचे पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. त्यांचे शेत गट क्रमांक १२८ मधील सुमारे तीन एकर क्षेत्रावरील तूर पीक रानडुकरांनी रात्रीच्या सुमारास अक्षरशः फस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सुरतेकर यांची बुरांडा (ख) शिवारात सुमारे साडेसात एकर शेती असून, यावर्षी त्यांनी कपाशी, तूर व गहू अशी मिश्र पिके घेतली होती. मात्र, यंदा झालेल्या सततधार पावसामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यातच रानडुकरांबरोबरच रोह्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे.

रानडुकरांच्या हल्ल्याची माहिती शेतकरी ज्ञानेश्वर सुरतेकर यांनी तत्काळ वन विभागाला दिली असल्याचे सांगितले. मात्र, परिसरात वारंवार होत असलेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी हतबल झाले असून, शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर