नागरीकांनी सहभागी व्हावे असे ठाणेदार यांचे आवाहन.
7 वाहनाचा लिलाव शासकीय पध्दतीने होणार.
विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,
मारेगांव पोलीस स्टेशन येथील बेवारस स्थिती असलेल्या 7 वाहनांचा लिलाव दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोज शुक्रवारला पोलीस स्टेशन मारेगाव येथे करण्यात येणार आहे जप्त केलेल्या वाहनांचा या लिलावासाठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ठाणेदार जनार्धन खंडेराव यांनी केले आहे.
मारेगांव येथील पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या अपघात व बेवारस बरेच दिवसापासुन 7 वाहने जप्त केली होती.या वाहनाबाबत वाहन मालकांनी आता पर्यंत मालकी हक्क सिध्द केलेला नाही.
त्यामुळे दिनांक 18 ऑगस्टला सकाळी 11 वाजता शासकीय नियमानुसार पोलीस स्टेशन मध्ये या वाहनांचा लिलाव करण्यात येणार असुन या लिलाबामध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ठाणेदार जनार्धन खंडेराव यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
