ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

हटवांजरी येथे कबड्डी सामन्याचे आयोजन.

85 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

प्रथम पुरस्कार 21हजार द्वितीय 16 तृतीय 10 हजार चतुर्थ 7 हजार.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

हटवांजरी येथे कबड्डीच्या खुल्या सामन्याचे आयोजन दिनांक 19 ते 21 जानेवारी 2023 पर्यंत करण्यात आले असून या सामन्यामध्ये बक्षिसाचे मोठ्या प्रमाणात लय लुट करण्यात आलेली आहे.



या कबड्डीच्या सामन्याचे उद्घाटन मारेगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरक्षक राजेश पुरी करणार असुन या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन संजय देरकर उपअध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अनिरुद्ध माथनकर पोलीस पाटील हटवांजरी,सरपंच निताताई कुमरे,उपसरपंच लोकेश चिकटे आणी ग्रामसेविका कु.काकडे मॅडम उपस्थीत राहणार आहे.

या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार एकविरा महिला ग्रामीण बँक मारेगाव तथा समस्त ग्रामवाशी हटवांजरी यांचे तर्फे 21.016 रुपये असुन द्वितीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व जिवन विकास माध्यमिक विद्यालय हटवांजरी यांचे वतीने 16.016 रुपयाचे आहे.

तर तृतिय पुरस्कार स्व. संभाजी पाटील लांडे व स्व.मारोती पाटील जुनगरी यांचे स्मृती प्रितिर्थ देण्यात आले आहे.
चतुर्थ पुरस्कार 7.016 रुपये शेतकरी युवा गणेश मंडळ हटवांजरी यांचे वतीने ठेवण्यात आले आहे. तसेच अंतीम सामन्यासाठी बेस्ट रेडर,बेस्ट डिफेन्डर यांना सुध्दा 1616 रूपयाचे बक्षिस असुन बेस्ट रेडर साठी स्वर्गीय गोपाल पाटील हेपट यांचे स्मृती प्रितिर्थ सुमित हेपट यांचे यांचे कडून तर बेस्ट डिफेन्डर साठी स्व.अशोक पाटील पारखी यांचे स्मृती प्रितिर्थ जगदीश पारखी यांचे कडून ठेवण्यात आले आहे.

या सामन्यासाठी प्रवेश फी.700 रूपये असुन लेट फी.1000 रू तसेच तक्रार फी.2000 ठेवण्यात आली आहे. तालुक्यातील तसेच परिसरातील कबड्डी खेळ चाहत्यांनी कबड्डी खेळणाऱ्या संघांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आव्हान श्री. दत्त कृपा क्रिडा मंडळ हटवांजरी ता.मारेगांव, जि. यवतमाळ यांचे वतीने करण्यात आले आहे.
संपर्क 93705 17900,92849 46985










.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर