ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

बोटोणी येथील अल्पभुधारक शेतकऱ्याची गळफास घेवुन आत्महत्या.

86 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]

मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासना कडून ठोस उपाय योजना केल्या जात नाही.तालुक्यात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही. बोटोणी येथील एका 65 वर्षीय इसमाने स्वताचे घरी नायलोनच्या दोराच्या सहाय्याने फाट्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 12 जानेवारी 2023 रोज गुरूवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की..
कवडू चांदोबा नेहारे वय सुमारे 65 वर्ष असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असुन त्याचे कडे 5 एकर शेती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.तो शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा या वर्षीचा अतिवृष्टी मुळे झाल्येल्या नुकसानी मुळे चिंतेत असताना त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. बातमी लीहे परियंत आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही.

कवडू यांनी आज स्वताच्या घरात नायलोनच्या दोराच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास येताच घटना उघडकीस आली.त्यांनी या घटनेची माहिती लगेच मारेगाव पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करुन शव उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मृतक शेतकरी कवडू यांचे पश्चात पत्नी,दोन मुले व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांचा मार्गर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर