ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

शहर स्वच्छतेसाठी ‘एक दिवस एक तास एक साथ’ उपक्रम राबवला

365 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव :स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत ‘एक दिवस एक तास एक साथ’ या उपक्रमाचे आयोजन नगरपंचायतीच्या वतीने आज करण्यात आले. शहरातील सिडाणा कॉम्प्लेक्स परिसरात घेण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत नागरिकांसोबत नगरपंचायतीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले.

या उपक्रमाला नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की, मुख्याधिकारी शशिकांत बाबर (मशप्रसे), नगरसेवक हेमंत नरांजे, नगरसेविका माला बदकी यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांच्या श्रमदानातून शहर स्वच्छ ठेवणे किती सोपे आहे, याची प्रचिती या मोहिमेतून आली.

मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले की, “गाव करी ते राव न करी” या उक्तीप्रमाणे शहर स्वच्छतेसाठी प्रत्येकाने पुढे यावे. सर्वांच्या साथीने आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे सहज शक्य आहे. शहराची स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नाही, तर सर्व नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर