ब्रेकिंग न्यूज
पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख…
SP News Maregaon

कुणी मदत देता का मदत,अपंग पती-पत्नीचा आर्त टाहो

101 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

पती जन्मापासून अपंग,पत्नी ही शारीरिक अपंग,दोघांनाही जगण्यासाठी साधन नाही,दोघांकडूनही मजुरीचे काम होत नाही,अशा अवस्थेत जगायचे कसे? असा प्रश्न या दाम्पत्यांपुढे निर्माण झाल्यामुळे यांच्या संसाराची वाताहत तर होणार नाही ना अशी अवस्था निर्माण झालेली आहे.

अशा अवस्थेत या अपंगांनी कोणी मदत देता का मदत असा आर्त टाहो फोडला.यांची परिस्थिती पाहून ह्रदय हेलावून टाकल्याशिवाय राहत नाही.ही कहाणी आहे मारेगाव तालुक्यातील खंडणी गट ग्रामपंचायत मध्ये येत असलेल्या भुरकी पोड येथील.गुणवंत रामदास मडावी हा 26 वर्षीय युवक जन्मापासून अपंग आहे. त्याचे वडील तो लहान असताना त्यांना सोडून गेले. त्याचे आईने त्याचा कसाबसा सांभाळ केला.


त्याला शिक्षणासाठी बोटोनी येथील आश्रम शाळेमध्ये टाकले आणि त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.अपंग मुलाचे जीवन असेच जाईल असे वाटत असतानाच रा.पांढरकवडा, तालुका केळापूर येथील  एका मुलीचा गुणवंताला निरोप आला. 2022 मध्ये पौर्णिमा हीचेशी गुणवंताचे चंद्रपूर येथे लग्न आटोपले.परंतु पौर्णिमा ही सुद्धा उंचीने फक्त तीन फुटाचीच.त्यामुळे एक अस्थिविंग तर दुसरी शारीरिक अपंग अशी जोडी जुळून आली.

पत्नी ग्रॅज्युएट आहेत पण तिचा संसारात काही उपयोग होत नव्हता. म्हणून दोघांनी भुरकी पोड येथे पान टपरी चे दुकान थाटले.दुकान छोटेसे गाव छोटासा त्याच्यामुळे आज दुकानांमधून त्यांना खूप असा प्रॉफिट मिळत नव्हता. कधी कधी खर्च सुद्धा बरोबर निघत नव्हता म्हणून ते दुकान त्यांनी बंद केले. दोघांच्याने मजुरीचे काम होत नसल्याने आता जगायचे कसे असा यक्षप्रश्न या दोन्ही अपंगां पुढे आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर