ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

फिसकी जंगलातील रस्ता ठरला मृत्यूचा सापळा; शिवसेनेचा चक्काजाम, प्रशासनाला दिला धक्का!

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील मार्डी–वणी मार्गावरील मच्छिंद्रा जवळील फिसकी जंगलातील जीवघेण्या रस्त्याविरोधात अखेर शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज (दि. २० मार्च) सकाळी १०:३० वाजता संतप्त शिवसैनिकांनी थेट रस्त्यावर उतरून जोरदार चक्काजाम आंदोलन छेडले.

या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून दोन्ही बाजू अक्षरशः खचल्या आहेत. साईड पट्ट्या धोकादायक बनल्या असून रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. अपघातांची मालिका सुरू असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र संबंधित बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा संताप अनावर झाला.

यापूर्वी “रस्ता तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा चक्काजाम” असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. तरीही प्रशासनाने केवळ दिखावूपुरते मुरूम टाकून काम पूर्ण झाल्याचे नाटक केल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे अखेर शिवसैनिकांचा संयम सुटला आणि आंदोलनाचा भडका उडाला.

या आंदोलनाचे नेतृत्व तालुका प्रमुख विशाल किन्हेकर आणि तालुका समन्वयक संजय आवारी यांनी केले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला.
“नागरिकांच्या जीवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही!”
तात्काळ दर्जेदार दुरुस्ती न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला ठणकावला.

दरम्यान, वाढता दबाव लक्षात घेऊन प्रशासनाने अखेर माघार घेत लेखी आश्वासन दिले. फिसकी जंगलातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरूम टाकून दुरुस्ती तात्काळ सुरू करण्यात येईल तसेच पॅचवर्क (सीलिंग) काम १ एप्रिलपासून हाती घेतले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. उद्यापासून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचेही प्रशासनाने जाहीर केले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात तालुकाध्यक्ष विशाल किन्हेकर, समन्वयक संजय आवारी, जीवन डाखरे, तालुका संघटक प्रवीण बल्की, उपतालुका प्रमुख प्रशांत कुमार भंडारी, विभाग प्रमुख प्रशांत राऊत, अनिल राऊत, उपजिल्हा महिला संघटक सौ.उज्वला चंदनखेडे,

महिला तालुका समन्वयक सौ. दर्शनाताई कुमरे, महिला विभाग प्रमुख सौ. संगिताताई टोंगे, कुळसंगेताई, शाखा प्रमुख महेश मुसळे, युवासेना कार्यकर्ते शाम कुमरे, प्रमोद शेळकी, सुनील पारोधी, कवडू मत्ते, संजय वडस्कर, पंढरी ताजणे, वनोजा देवी शाखा प्रमुख बाळा बरडे, युवासेना तालुकाध्यक्ष निखील कालेकार, उपतालुका प्रमुख विकास वैद्य, कु.ऊ.बा.स संचालक ब्रह्मदेव जुनगरी, मुकुंदा निवल, गोपी बावणे, सोमेश्वर गेडेकर, तेजस कापसे, शुभम ठावरी, कार्तिक नेहारे, गोविंदा निखाडे, पंकज खिरटकर, राजू खिरटकर, दिगांवर नावडे, गणेश आसुटकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अभियंता केतन परतानी, नायब तहसीलदार विजय मत्ते, ठाणेदार श्याम वानखेडे तसेच बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सुरज महले यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणली.आता प्रश्न एकच — आश्वासनाची अंमलबजावणी कधी?

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर