ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार

148 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वाढीव टप्पा मिळेपर्यंत पेपर न तपासण्याचे आवाहन

सुरेश पाचभाई मारेगाव,

1 जानेवारी 2024 पासून पुढील  वाढीव टप्पा वाढ मिळेपर्यंत अंशतः अनुदानित  शिक्षक तथा प्राध्यापकांचा इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार राहील या संदर्भातले निवेदन शिक्षक समन्वय संघाने  गटविकास अधिकारी पंचायत समिती मारेगाव तथा तहसीलदार यांना दिलेले आहे.

अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यात यावा यासाठी वेगवेगळ्या संघटनांमार्फत मुंबई येथील आझाद मैदानावरती आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाला मागे आश्वासन देऊन थांबवण्यात आले होते.परंतु नंतर या आंदोलनाची कोणतीही दखल न घेता पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे पुन्हा मुंबई येथे शिक्षक संघटनांकडून आंदोलन सुरु आहे.

या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यस्तर जिल्हास्तर तथा तालुकास्तरावरील सर्व शिक्षकांनी तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांनी बारावीच्या तसेच दहावीच्या परीक्षेच्या पेपर  तपासणी वरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भातली निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शिक्षण मंत्री दिपक केसरकर,तहसीलदार मारेगाव उत्तम निलावाड आणि गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे यांना दिले.

एक जानेवारी 2024 पासून वाढीव टप्पा तसेच दरवर्षी वाढीव टप्पा जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत हे आंदोलन कायम राहील असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदन राज्य समन्वयक पुरुषोत्तम येरेकर यांच्या नेतृत्वात मारेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोबडे, तालुका सचिव संदीप देरकर,भारद्वाज निखाडे, प्रमोद कावडे, दिलीप मांडवकर, योगेश वेले,आनंद गोहोकर, सतीश सांगोले, प्रवीण हेपट, निलेश जाधव यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर