ब्रेकिंग न्यूज
⚡ News18 Marathi Headlines | 13 NOV | 9 AM | Sanjay Shirsat News | NCP Merger | Shiv Sena | Fadnavis ✦ ⚡ अवघ्या 10 हजारांची गुंतवणूक करेल मालामाल, मधमाशी पालनाचा दुहेरी फायदा, शेतकऱ्यांनी काय करावं? Video ✦ ⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं…
SP News Maregaon

बोरी (गदाजी) येथे होलिका पर्वावर भव्य गोटमार यात्रचे आयोजन

154 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या बोरी(गदाजी) येथे होलिका पर्वावर यात्रा महोत्सवाचे आयोजन कमिटी तर्फे करण्यात आले करण्यात आले.असुन दिनांक 25 मार्च 2024 रोज सोमवारला यात्रेला सुरुवात होत आहे.

बोरी गदाजी येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुन परंपरा असुन राज्यासह लगतच्या राज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. गावाच्या बाजूला लागूनच असलेल्या वाहणाऱ्या छोट्याश्या नदीत श्री.संत गदाजी महाराज यांचे मंदिर असून धुलीवंदणाच्या दिवशी येथे यात्रेचे आयोजन कमेटी तर्फे करण्यात येते.

धुलीवंदनाच्या दिवसी येथील मंदिराच्या परिसरात सकाळी कबड्डी खेड्ल्या जाते जो गडी शेवटी बाद होतो त्या गाड्याची (मढ) मिरवणुक संपूर्ण गावासभोवती वाज्या गाज्यात काढल्या  जाते व त्याला मंदिर परिसरात आणल्या जाते.त्या नंतर प्रसिद्ध गोटमार खेळल्या जाते.मंदिरा शेजारी मचान उभारून त्यावर दगडासह काही भाविक असतात.मचानीवर असलेले भाविक जमीनी वरील भाविकांवर गोटमार करतात.

तर जमीनी वरील भाविक माळ्यावरील भाविकावर गोटमार करीत असुन जवळपास सुमारे 1 ते 2 तास हा खेळ सुरू असतो.जेव्हा एखाद्या भक्ताला दगड लागुन जखमी होऊन भक्त जमिनीवर कोसळतो तेव्हा हा खेळ थांबवुन जखमी भक्ताला मंदिरात घेवुन जातात.त्यानंतरच तो जखमी भक्त बरा होत असल्याची माहीती गावकरीऱ्या कडून प्राप्त होते.

गोटमारची परंपरा जोपासत ही यात्रा कोरोणाचा कालावधी सोडला तर सातत्याने भरवल्या जात आहे.दिनांक 19 मार्च 2024 रोज मंगळवारला मंदिरात घटस्थापणा करण्यात येणार आहे.तर सोमवार दिनांक 25 मार्च 2024 रोजी सकाळी 8 वाजता होळकर खेळ (मढ) रंगपंचमी मिरवणुक व त्या नंतर सकाळी 11 वाजता भव्य गोटमार व दुपारी 2 वाजता दहीहंडी आणी गोपाल काला दुपारी 4 वाजता महाराजांच्या पालखीची मिरवणूक आहे.

आणी दिनांक 28 मार्च 2024 रोज गुरुवारला पाखड पुजा करण्यात येणार आहे.या दरम्यान यात्रेच्या आयोजनाची तयारी पुर्ण झाली असुन भाविकांनी दर्शनासाठी व यात्रेचा लाभ घेण्याचे विश्वस्तांनी आवाहन श्री संत गदाजी महाराज देवस्थान कमिटी बोरी (बु.) र.न.ओ-654 व समस्त ग्रामवासी बोरी, गोटमार खेळाडू बोरी (गदाजी), ता.मारेगांव, जि. यवतमाळ यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर