ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मनस्वी राज्यस्तरीय आदर्श बालगौरव पुरस्काराने सन्मानित

177 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पि.न्युज.नेटवर्क मारेगांव,

पुणे येथे नुकतेच पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात  स्वप्नल फाउंडेशन पुणे यांनी महाराष्ट्र राज्यातील कला, क्रीडा , सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुणे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात मुळगाव चि.बोटोनी जिल्हा यवतमाळ सध्या राहणार कोंढवा बुद्रुक,पुणे येथील हिंदरत्न कु.मनस्वी विशाल पिंपरे हिला स्केटिंग मधुन अष्टपैलू कामगिरी करिता तिला आदर्श बालगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्वप्नल फाऊंडेशन अध्यक्षा सौ.शोभाताई बल्लाळ, निवृत्त जिल्हा न्यायाधीश पुणे रवींद्र कुलकर्णी, तसेच माईंड पॉवर ट्रेनर डॉ.दत्ताजी कोहिनकर यांच्या हस्ते मनस्वीला हा पुरस्कार देण्यात आला.मनस्वीने नुकतेच मेडलचे शतक पूर्ण केले त्यामध्ये 82 सुवर्ण पदके , 9 रजत पदक आणि 9 कांस्य पदक आहेत. याशिवाय 2023 ची नॅशनल स्केटिंग चॅम्पियन आहे.

गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड सह अनेक जागतिक विक्रम मनस्वीने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी हे सुवर्ण यश संपादन केले आहे. मनस्वीला अष्टपैलू कामगिरी आतापर्यंत विविध 14 पुरस्कार मिळाले. ती सध्या रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमी पुणे येथे प्रशिक्षण घेत असून तिच्या यशात तिचे प्रशिक्षक व तिच्या पालकांचा खुप मोठा वाटा आहे. तिला मिळालेल्या आदर्श बालगौरव पुरस्कारा मुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर