ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बुरांडा ते हटवांजरी रस्त्यावर अपघात एक गंभीर जखमी

112 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रस्त्याच्या कडेचे काटेरी झाड देत आहे अपघाताला निमंत्रण

संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज

सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील बुरांडा ख.येथे गावात जाण्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडपे रस्त्याच्या कडेलाच वाढलेले आहे.त्यामुळे या रस्त्याने साधी बैलगाडी आली तरी दुचाकीस्वारांना जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नाही.

अशातच आज सकाळी एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक २० मार्च २०२४ रोज बुधवारला सकाळी १० वाजताचे दरम्यान घडली असुन अजय किसन वाघाडे अंदाजे वय २४ वर्ष रा. खंडणी ता.मारेगाव जि.यवतमाळ असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव असुन तो आज सकाळी काही कामानिमित्त खंडणी येथून मारेगाव येथे गेला होता.

मारेगाव येथील काम आटोपून परत गावाला खंडणी येथे जात असताना रस्त्यातच बुरांडा बस स्टॉप पासून जवळच लॉ कॉलेज समोर काटेरी झुडपामुळे टर्निंगवर त्याला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे त्याची गाडी काटेरी सुबाभळीच्या झाडाला जाऊन धडकली यात तो गंभीर जखमी झाला.

अपघात होताच रस्त्यांने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी सदर घटनेची माहिती मारेगांव पोलिसांनी दिली व त्याला साई मित्र परिवाराच्या ॲम्बुलन्सने निलेश बेंडे आणि प्रज्वल नांदे यांनी त्यांना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालत दाखल केले.असून या प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

“सदर रस्ता हा मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत असून या रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडपे झालेले आहे मात्र संबंधित विभाग याकडे कायम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहे”

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर