ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

पिसगाव येथे १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

16 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव : तालुक्यातील पिसगाव येथे अवघ्या १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (९ जानेवारी) सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

कुंदन बबन आत्राम (वय १७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मारेगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. कुंदन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे आई-वडील रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

शुक्रवारी सायंकाळी कुंदनचे आई-वडील शेतातून घरी परतल्यानंतर घरात घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर एकच आक्रोश झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कुंदनच्या अकाली मृत्यूमुळे आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांची मानसिक अवस्था अत्यंत विदारक झाली आहे.या घटनेने पिसगावसह परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर