ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

27 वर्षीय उच्चशिक्षित इंजिनियर युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

3.6k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव येथील गिरसावळे लेआउट प्रभाग क्रमांक 16 मधील इंजिनियर पदावर असलेल्या उच्चशिक्षित युवतीने स्वतःचे राहते घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 8 मे 2025 रोज गुरुवारला सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

कु.दिक्षा केशव उमरे वय अंदाजे 27 वर्षे रा. मारेगाव असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

दिक्षा ही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करुन औरंगाबाद येथे एका कंपनीत नौकरी करत असल्याची माहिती आहे.दिक्षाने टोकाचे पाऊल उचलत स्वतःचे राहते घरी बेडरूम मध्ये पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.सकाळच्या सुमारास कुटुंबियाच्या लक्षात येताच सदर घटना उघडकीस आली.

कुटुंबीयांनी सदर घटनेची माहिती लगेच मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळतात मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळ  पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.तिच्या आत्महत्येचे नेमके कारण बातमी लिहेपर्यंत कळू शकले नाही.

दिक्षाच्या पश्चात आई, सेवानिवृत्त वडील व एक लहान बहीण असा प्राप्त परिवार आहे. सदर घटनेने मारेगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गदर्शनात जमदार आनंद अलचेवार करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर