ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

कोलकाता प. बंगाल येथे महाराष्ट्राचा डंका, मनस्वीला ३ कांस्य पदके

823 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील सध्या राहणार कोंढवा बु. पुणे येथील कु. मनस्वी विशाल पिंपरे हिने नुकत्याच कोलकत्ता, पश्चिम बंगाल येथे पार पडलेल्या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ९व्या रँकिंग ओपन नॅशनल स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये १o वर्षा आतील मुलीच्या वयोगटात २०० मीटर , ५०० मीटर आणि १००० मीटर स्पीड स्केटिंग रेस मध्ये ३ कांस्य पदके मिळवून ह्या नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे.

मनस्वी अवघ्या ७ वर्ष ६ महिन्याची असून १० वर्ष वयाच्या मुलीच्या वयोगटात ३ कांस्य पदके मिळवणे गौरवास्पद आहे, गेल्या ४ वर्षाच्या प्रशिक्षण कालावधी मध्ये मनस्वीने ३ नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये भाग घेतला असून एकूण ४ कांस्य पदके महाराष्ट्र राज्यासाठी आणले आहे.

खुप कमी कालावधीत हे यश मिळवण्यासाठी मनस्वीने अथक परिश्रम घेतले आहे , तीचे स्केटिंग प्रशिक्षक विजय मलजी सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, ती सध्या मारुती बधे मेमोरियल स्कूल , कोंढवा येथे शिकत आहे. या नॅशनल स्केटिंग स्पर्धेकरिता सामाजिक कार्यकर्ते श्री विजुभाऊ चोरडिया यांचे विशेष सहकार्य मिळाले. मनस्वीच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर