ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

5 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन जयंती साजरा करण्याचे निर्देश द्यावे

187 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अनुयायांनी निवेदनाद्वारे केली तहसीलदारांना मागणी

सुरेश पाचभाई मारेगाव,

5 सप्टेंबरला श्री चक्रधर स्वामी अवतार दिन जयंती कार्यक्रम साजरा करण्याबाबत अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत अशा प्रकारचे निवेदन त्यांचे अनुयायांनी तहसीलदार मारेगाव यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे 2024 मध्ये राष्ट्रपुरुष किंवा थोर नेत्यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतच्या परिपत्रकात यावर्षी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या जयंती कार्यक्रमाचा नव्याने समावेश केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने 27 डिसेंबर 2023 आणि 18 जानेवारी 2024 रोजी परिपत्रक निर्गमित करून राज्यात तीन टक्के  देशात दीड कोटी  लोकसंख्या असणाऱ्या महानुभव पंथीय साधकांसह मराठी सारस्वतांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

चक्रधर स्वामी यांनी 800 वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रभर पायी भ्रमण करून तळागाळातील जनतेला ज्ञानामृत दिले.सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सत्य, अहिंसा, मानवता,समता ही वैश्विक मूल्य समाजाला दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, शैक्षणिक आदि निती मूल्यांचा  जनतेला उपदेश केला.  तसेच त्यांचे जिवो धारक विचार तत्त्वज्ञान, मानवतावादी कार्य,अलौकिक साहित्य,सामाजिक योगदान,जातपात,स्पृश्य अस्पृश्य, कर्मकांड,व्रतवैकल्याचा बिमोड मुळासकट करून भेदभाव दूर करण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी समाज क्रांती केली.

तसेच त्यांनी दारू, मास,चोरी, जुगार, शिका,र परस्त्रीगमन, वेश्यागमन अशा व्यसनांपासून दूर राहण्याचा सुद्धा उपदेश केला.या चक्रधर स्वामींनी जोपासलेली ही जागतिक संधी समाजाभूमीक व्हावी,यांच्या विचारांची माहिती संपूर्ण विश्वाला कळावी यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त पाच सप्टेंबरला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश आपण निर्गमित करावे अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.यावेळी दत्त मंदीर, श्री. दत्त सेवाश्रम, करणवाडी संस्था/संचालक विनोद जयकृष्णा दर्यापुरकर,दत्त मंदिर चे संचालक परसराज दर्यापूरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, नगरसेवक आकाश बदकी,बाजार समितीचे संचालक यादव काळे,सागर काळे,प्रशांत बुटे,अनंता निब्रड,रवी गायधन, निलेश धोटे, जगन गायधन, संगम काळे,अनिल भोयरबाबाराव बहादुरे, मारोती थेरे, ईश्वर थेरे, संतोष रंगारी, दिनेश भोयर,लीलाधर काळे, सुनील उताणे,भालचंद्र वामनराव झोटिंग,यांचेसहित अनेक अनुयायी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर