ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Crime News : आजकल जो तो मोबाईल काढतो आणि Reel किंवा V Log बनवत असतो. याला काही लोक अपवाद असतील. पण सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर उठसुठ रिल किंवा वि लॉग बनवत असतात. हे रिल बनवता ते आपली खाजगी माहिती जगासमोर आणत असतात. अशीच सोशल मिडिया इन्फलूएन्सर होती जी दररोज अंगावर दागिने घालून व्हिडिओ बनवायची. विशेष म्हणजे ती महिन्या महिन्याला दागिने खरेदी करायची आणि फॅन्सना देखील दागिने खरेदी करा असे आवाहन करायची. तिच्या या व्हिडिओवर प्रचंड लाईक्स कमेंट यायचे. पण आता क्षणार्धात सगळ नाहीस झालं आहे.त्यामुळे तिच्यासोबत नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.

सोशल मिडिया इन्फ्लूएन्सरच नाव मधुमिता आहे. ती कन्याकुमारी जिल्ह्यातूील नागरकोविलजवळील धम्मधु कोनम भागातील व्हिआयपी गार्डनमध्ये पती विनोदकुमार आणि त्यांच्या मुलासोबत राहते. काही दिवसांपूर्वी खरेदी करण्यासाठी मार्केटला गेली होती, त्यामुळे ती उशिरा गेली होती. याच गोष्टीचा फायदा घेऊन चोरांना तिच्या घराचा मागचा दरवाजा तोडून सोनं लांबवलं आहे.

घरी आल्यावर जेव्हा मधुमिता तिच्या गुप्त खोलीत गेली तेव्हा तिथे ठेवलेले 118 तोळे सोन्याचे दागिने चोरटे चोरी करून पसार झाले होते. चोरीला गेलेल्या दागिन्यांचे आणि रोख रक्कमेचे एकूण मूल्य सुमारे 1 कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर मधुमिताने राजाकमंगलम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रावरीवरून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे या घटनेचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक देखील नेमले आहे.

दरम्यान सोशल मीडियावर मधुमिता ही दागिन्यांचे प्रदर्शन करत असल्याने अनेकांना तिच्याकडे खुप सोने आहे याची कल्पना होती. तसेच माझ्याकडे सोन्याच्या 4 उपयुक्त थाळ्या आहेत. त्यातही, मला 15 पाऊंडची सोन्याची चेन आवडते आणि त्यावर माझ्याकडे 40 पाऊंडची सोन्याची थाळी आहे, जी मी कधीच घालत नाही. मी ती फक्त कार्यक्रमांमध्ये घालते. मी महिन्याला सोने खरेदी करते तुम्ही करा,असे आवाहन मधुमिता तिच्या व्हिडिओच्या माध्यमातून करायची. पॉलिमर न्यूजने तिचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

त्यामुळे मधुमिता व्हिडिओ करत असताना चोरांना तिच्या संपूर्ण घराची हेरगिरी केली असेल. तिच्याकडे किती दागिने आहेत, तसेच हे दागिने ती कुठे ठेवते? सोने खरेदी करायला ती कोणत्या दिवशी जाते,त्याप्रमाणे चोरांना प्लान बनवून मागच्या बाजूचा दरवाजा कापून घरात प्रवेश केला आणि कपाटातून सुमारे 1 कोटी रुपये किमतीचे 118-120 सॉव्हरिन (सुमारे ९४४-९६० ग्रॅम) सोने व काही रोख रक्कम चोरून नेले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

This Youtuber from KanyaKumari showed off her money & jewelry in the vlog.

Thieves broke the house & stole 1 Cr. worth of jewelry.pic.twitter.com/WEebM03dkZ
— Vije (@vijeshetty) September 25, 2026

दरम्यान सोशल मीडियावर व्हिडिओ टाकताना आपली खाजगी माहिती व्हिडिओत जाऊ नये,याची काळजी घेतली पाहिजे. राजाकामंगलम पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल रेकॉर्ड्सच्या आधारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.त्यामुळे आता या प्रकरणात आता चोरटे सापडतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर