ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचा वर्धापन दिन उत्साहात

960 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

स्वामी विवेकानंद अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र मारेगाव यांचा नववा वर्धापन दिन स्वामी विवेकानंद जयंतीच्या पर्वावर  दिनांक 12 जानेवारीला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विलास मेश्राम, प्रमुख मार्गदर्शक प्रवीण खंडाळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आशिष सर अचलपूर  हे उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचा यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहेत.दिनांक 12 जानेवारी 2015 ला लावलेल्या या रोपट्याचे मोठ्या वाटवृक्षामध्ये रुपांतर झाले. या अभ्यासिकेचा विस्तार ग्रामीण भागात सुद्धा होत आहेत. याच अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक  युवक वेगवेगळ्या नोकरीवर सुद्धा लागलेले आहेत. यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी सीमा आत्राम,अनामिका उईके, अविनाश टेकाम (सर्व ग्रामसेवक) सुहास उताणे, आरोग्य सेवक, मंगेश भेदुरकर, स्टेनोग्राफर, मनोज भेदुरकर एम.एस.एफ. इत्यादी यशस्वी विद्यार्थ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन प्रवीण पोटे यांनी तर आभार प्रदर्शन शंकर सिडाम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीते करता राजेश मुरझडीसह अभ्यासिकेतील युवकांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर