ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जालना: जालना शहरात जीम ट्रेनरची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना काल सकाळच्या सुमारास घडलीये. ३० वर्षीय राहुल राजपूत असे हत्या करण्यात आलेल्या जीम ट्रेनरचे नाव आहे. शहरातील लोधी मोहल्ला भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींमध्ये एक अल्पवयीन असून दुसऱ्या आरोपीचे नाव श्रेयस पवार आहे. दोन्हीही आरोपी जालना शहरातील विद्युत कॉलनीतील रहिवासी आहे. पाच हजार रुपये देऊनही प्रोटीन दिले नसल्यामुळे ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दुचाकीवरून तरुण आले, चाकूने वार करून पळून गेले
जीम ट्रेनर असलेला राहुल राजपूत शुक्रवार रोजी सकाळी लोधी मोहल्ला भागात होता. यावेळी दोन तरूणांनी दुचाकीवर घेऊन त्याच्यावर चाकूने वार केले. यावेळी नागरिकांसह कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी, त्याला तपासून मृत घोषित केलं.
पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले, एक अल्पवयीन
यानंतर काही तासातच पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. यातील एक अल्पवयीन असून तर दुसरा श्रेयस पवार आहे हे दोन्हीही संशयित आरोपी जालना शहरातील विद्युत कॉलनी भागातील रहिवासी आहेत दरम्यान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर