ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

उद्या मारेगावात विद्यार्थी गुणगौरव सोहळा

466 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणगौरव समीतीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही उद्या 31जुलैला विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.शहरातील शेतकरी सुविधा केंद्रा मधील आयोजीत सोहळ्यात 10 वी शालांत परिक्षेत 80 टक्के तर 12 वी शालांत परिक्षेत 60 टक्क्यां वरील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.

या गुणगौरव सोहळ्याचे उदघाटन उद्या दुपारी 12 वाजता  वणी वर्धमान फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन को.ऑपरेटिव सोसायटीचे डायरेक्टर विजयबाबु चोरडीया हे करणार आहे.एकदिवशी या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट हे राहणार असुन स्वागताध्यक्ष म्हणून यवतमाळ दुग्ध विकास विभागाचे सेवानिवृत्त अधिक्षक श्रीराम कुमरे हे राहाणार आहे.

प्रमुख अतिथी म्हणुन मारेगाव दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल किन्हेकार, गुरुदेव भजन मंडळाचे दयाल रोगे,सराटीचे सरपंच तुळशीराम कुमरे, जिल्हा परिषद निवृत्त शिक्षक तुळशीराम पेंदोर, हे राहाणार असुन  मारेगावचे तहलिदार उत्तम निलावाड,ठाणेदार उमेश बेसरकर, मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे,

मारेगाव वनपरिक्षेत्राधिकारी शंकर हटकर, मारेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर, मारेगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी संदीप वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सुहास ओचावार,विद्युत महवितरण विभागाचे अभियंता शामसुंदर कुर्रा, एकात्मिक महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी दिपक कळमकर,

भारतीय स्टेट बँक चे व्यवस्थापक तुषार क्षीरसागर, हे आप आपल्या विभागाशी सबंधीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. उद्या 31 जुलै दुपारी 12 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा विद्यार्थी सोहळा सुरु राहणार असुन उपस्थीतांसाठी भोजन व्यवस्था कार्यक्रम स्थळी करण्यात आली आहे.आयोजीत कार्यक्रमात सर्व गुणवंत विद्यार्थ्यासह त्यांच्या पालकांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन या सोहळ्याच्या आयोजक प्रतीभा तातेड यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर