ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मनस्वी विशाल पिंपरे राष्ट्रीय तथा राज्य स्तरीय अशा दुहेरी क्रीडा पुरस्काराने सन्मानित.

124 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील सध्या पुणे येथे स्थायिक झालेले मनस्वी विशाल पिंपरे हीची नुकत्याच 29 ऑगस्ट 2022 रोजी मानपाडा ठाणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा अधिवेशन 2022 तथा मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त नॅशनल स्पोर्ट डे चे औचित्य साधून विविध खेळातून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

त्यामध्ये मनस्वी विशाल पिंपरे (वय ४ वर्ष ८ महिने) हिने स्केटिंग या खेळातून राज्यस्तरीय तथा राष्ट्रीय स्तरावरील अनेक सुवर्णपदके पटकावले आहे आत्तापर्यंत 38 गोल्ड मेडल 5 सिल्व्हर मेडल व 5 ब्राँझ मेडलसह स्केटिंग मध्ये 14 बुक ऑफ रेकॉर्ड व गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मनस्वीची नोंद झालेली आहे.

अवघ्या एक वर्षात मनस्वीने स्केटिंग या खेळातून केलेल्या उत्कृष्ट कामगिरी करिता तिला मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद भारत यांच्यातर्फे सुवर्णलक्ष नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड तसेच मास्टर चंदगीराम राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला संपूर्ण भारतातून 152 खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये मनस्वी वयाने सर्वात लहान होती, ह्या पुरस्कार मिळण्यामागे ती स्वतः व तिचे प्रशिक्षक विजय मलजी सर यांचा सिंहाचा वाटा आहे.

याशिवाय तिची महाराष्ट्र खेल पुरस्कार करिता निवड झालेली आहे, मनस्वी सध्या रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमी पुणे येथे प्रशिक्षण घेत असूनयेत्या काळात स्केटिंग या खेळातून जागतिक स्तरावर ऐतिहासिक विक्रम स्थापित करणार आहे.तीला पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर