ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

शिक्षक शाळेत असून विद्यार्थ्यांची बुट्टी कारण काय तर शिक्षिका जुनीच हवी

1.4k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

खापरी वासियांचे गटविकास अधिकारी मारेगाव यांना निवेदनातून साकडे

प्रमोद रा.मेश्राम मारेगाव

मारेगाव तालुक्यातील खापरी हे गाव पेसा गट ग्रामपंचायत सगणापूर अंतर्गत येत असुन जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा खापरी येथील कंत्राटी शिक्षिकेची तात्पुरती हटवांजरी येथे करण्यात आलेली बदली रद्द करण्यात यावी या करीता खापरी येथील ग्रामस्थांनी आज दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोज मंगळवारला गटविकास अधिकारी पंचायत समिती मारेगाव यांना निवेदन दिले आहे.

खापरी हे छोटेसे गाव आहे या गावातील जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये एक ते चार वर्ग आहे.व दोन शिक्षक आहे.पण त्या पैकी एका कंत्राटी शिक्षकेला तात्पुरते हटवांजरी येथे दिल्याने व रेगुलर शिक्षकाला निवडणूक ड्युटी असल्यामुळे सदर शाळेवर नवीन शिक्षकांना पाठवण्यात येत असल्याने त्या शिक्षकांशी विद्यार्थ्यांची नाळ जुळत नसल्याने विद्यार्थी शाळेला बुट्टी मारताना दिसत आहे.

त्यामागील ही कारण तसेच आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षकांशी एकदा नाळ जुळली की त्या शिक्षकाशिवाय इतर शिक्षकांना आपले करून नाळ जुडविण्यास कित्तेक वेळ लागते. हे आजच्या सद्यस्थिती वरून लक्षात येते.

सदर कंत्राटी शिक्षिकेची नियुक्ती ही मा.सर्वोच्च न्यायालय यांनी दुसरा शिक्षक रुजू होईपर्यंत नेमणूक खापरी येथे केली असता दुसरा शिक्षक यायच्या अगोदरच या कंत्राटी शिक्षिकेची तात्पुरती बदली करण्यात आली आहे. या मुळे प्रशासनाचा मनमानी कारभार दिसून येत आहे.

खापरी हे गाव पेसा ग्रामपंचायत सगनापुर अंतर्गत येत असून मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे सदर शिक्षकेची नेमणूक खापरी येथे करण्यात आली आहे. पण सदर कंत्राटी शिक्षिकेची तात्पुरती हटवांजरी येथे करण्यात आलेली बदली रद्द करण्यात यावी असे निवेदन गावकऱ्यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याच्या मार्गावर आहे.

आमच्या गावातील शिक्षकेला खापरी येथील शाळेवर देण्यात यावे अशी मागणी पालकवर्ग व ग्रामस्थयांचे कडून केली जात आहे. यावेळी विठ्ठल निळकंठ पाचभाई ,सुनील जयराम आवारी,सुधाकर मोतीराम कुचनकर,संदीप बंडू गुंजेकर,प्रभाकर बापुराव कुचनकर,सुरेश निळकंठ पाचभाई,मारोती बंडू गुंजेकर,रामकृष्ण आनंदराव कुचनकर,बंडू संभा गुंजेकर,लक्ष्मण कुचनकर,भीमराव रामू उरवते,संतोष जयराम आवारी,बाबाराव भीमा कुचनकर,शंकर निळकंठ पाचभाई,राहुल प्रभाकर कुचनकर, संदीप भीमराव उरवते, विनोद कुचनकर, पवण उरवते,सौ.वैशालीताई आवारी, सौ.जोतीताई गुंजेकार यांचे सह अनेकांनी निवेदनावर सह्या केल्या आहे.

مراد

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर