ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मारेगावात गुणगौरव सोहळा थाटात संपन्न

107 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात उत्तीर्ण झालेल्या तसेच विशेष कार्य करणाऱ्या लोकसेवक व पदाधिकारी यांचा जाहीर सत्कार दिनांक ३१ जुलै २०२५ रोज गुरुवारला दुपारी १२ ते ५  या वेळेत शेतकरी सुविधा केंद्र येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणगौरव समिती द्वारा आयोजित गुणगौरव सोहळा २०२५ मध्ये थाटात संपन्न झाला.

या सोहळ्याचे उद्घाटन अध्यक्ष वर्धमान फाउंडेशन वणी व संचालक बुलढाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी विजयबाबु चोरडिया व मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची  पूजा व पुष्प अर्पण करून करण्यात आले.

तर या सोहळ्याचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय सरपंच संघटना अध्यक्ष मारेगाव तालुका अविनाश लांबट यांनी भूषविले असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, मुख्याधिकारी शशिकांत बाबर,शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक तुषार क्षीरसागर,

उपकार्यकारी अभियंता विद्युत महावितरण श्यामसुंदर कुर्रा,कृषी अधिकारी पंचायत समिती संदीप वाघमारे, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर व सहाय्यक गटविकास अधिकारी हेमराज राठोड हे लाभले असून सर्वांनी विचारमंचावरून उपस्थित श्रोत्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सराटी तुळशीराम कुमरे, अध्यक्ष जय शिवाजी दुर्गा उत्सव मंडळ मारेगाव विशाल किन्हेकर व सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळ घोडदरा दयाल रोगे हे लाभले असून विचार मंचावर उपस्थित उद्घाटक, अध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख पाहुण्यांनी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या

असून या सोहळ्यात विद्यार्थ्यांचे व  विशेष कार्य करणारे लोकसेवक व पदाधिकारी म्हणून सरपंच सावंगी ग्रामपंचायत अभिजीत मांडेकर, जिल्हा परिषद शिक्षिका कामिनी दोडके (दांडेकर), ग्राम विकास अधिकारी रेवीचंद जनबंधू, तलाठी संजय शिंदे, पोलीस पाटील अर्चना सयाम, वनरक्षक प्रफुल्ल मलमकर ,समाजसेवक विमल फुलझेले,पत्रकार पंकज नेहारे, रास्त भाव दुकानदार पांडूरंग कोहळे,रोजगार सेवक खुशाल येरगुडे व उद्योजक धम्मपाल दारुंडे चोखाजी गॅस एजन्सी यांना सन्मानचिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन पत्रकार दै.नमो महाराष्ट्र माणिक कांबळे यांनी तर प्रास्ताविक उपसरपंच वनोजा (देवि) व सामाजिक कार्यकर्ता प्रशांत भंडारी तसेच आभार आयोजक पत्रकार सांध्य दै.यवतमाळ मार्मिक प्रतिभा तातेड यांनी मानले असून कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सामाजिक कार्यकर्ता आदेश तातेड यांचे योगदान लाभले असून या सोहळ्याची सर्वत्र सकारात्मक चर्चा सुरु आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर