ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन, नई दिल्ली व ओबीसी जनमोर्चा च्या पदाधिकारी यांची झरी येथे पार पडली सभा…

56 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)

सविस्तर वृत्त असे की..
झरी (जामनी) तालुक्यातील सर्व ओ.बी.सी. (व्ही .जे./ एन.टी. एस बी सी)बांधवांची आढावा बैठक आज झरी जामनी येथील रेस्ट हाऊस वर आयोजीत करण्यात आली होती. या
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक -डॉ. ज्ञानेश्वर गोरे(प्रदेश अध्यक्ष भा. पी. ओबीसी शो. संघटन तथा ओ.बी.सी मोर्चा तथा राज्य उपाध्यक्ष मा विलास काळे
(केंद्रीय प्रतीनीधी भा.पी. ओ.बी.सी. शो. संघटन तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ओ.बी.सी,जन मोर्चा .) भानुदास केळझरकर,( राज्य कोषाध्यक्ष बी .पी.एस. एस.)
ज्ञानेश्वर रायमल,अशोक मोहुरले हे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकी मध्ये
आशिष साबरे यांची भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन, नई दिल्ली व ओबीसी जनमोर्चा च्या झरी जामनी तालुकाध्यक्ष पदी तर संजय चामाटे यांची सचिव पदी निवड करण्यात येऊन नियुक्ती प्रमाणपत्र मा डॉ ज्ञानेश्वर गोरे प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले. सदस्य म्हणून प्रविण बेरेवार सर, राजेश कर्णेवार, हनुमान गौउत्रे, राजू गुरनुले, रुपेश गुरनुले, मिलिंद गुरनुले इत्यादि ची निवड करण्यात आली. या वैचारिक सभेत ओबीसी सी संबंधित मुद्द्यांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यात
नगर परिषद जिल्हा परिषद मधील ओबीसींचे संपलेले आरक्षण .ओ .बी.सी च्या विद्यार्थ्यांना महा ज्योती या संस्थेत अर्ज करण्यास संबंधात चर्चा करण्यात आली
केंद्र सरकारने ओ.बी.सी. यांची जनगणना थांबवली आहे. ती जात निहाय जनगणना स्वतंत्र कॉलम मध्ये झाली पाहिजे यावर विस्तृत चर्चा झाली. तसेच राज्य आणि केंद्र सरकार तर्फे ओ.बी.सी. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती मध्ये वाढ करावी.यवतमाळ जिल्ह्यामध्ये सिक्युरिटी च्या नावाखाली फसवणूक झालेल्या सर्व ओबीसी भावांची मदत करणे व न्यायालयीन लढाई व आंदोलनात्मक भूमिका घेण्यासाठी चर्चा करण्यात आली.
झरी जामनी तालुक्यातील ओबीसी बांधवाना आपल्या हक्काची आणि कर्तव्याची जाण करून घेण्यासाठी चळवळ भक्कम करावी असे प्रतिपादन मा ज्ञानेश्वर गोरे सर यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर