ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

उद्या वसमत पालिकेसाठी ७२ मतदान केंद्रावर मतदान:५९ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वसमत पालिका निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी शनिवारी ता. १९ एकूण ७२ मतदान केंद्रावर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान घेतले जाणार असून सुमारे ५९ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वसमत नगर पालिकेच्या नगराध्यक्षपद व १५ प्रभागातील ३० नगरसेवक पदासाठी निवडणुक होत आहे. यासाठी शनिवारी ता. १९ वसमत शहरातील ७२ मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेसाठी ५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी पाच कर्मचारी नियुक्त केले जाणार असून उर्वरीत कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहे. वसमत शहरातील संवेदनशील मतदान केंद्रावर वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या शिवाय इतर ठिकाणीही पोलिस बंदोबस्त राहणार आहे. तसेच राज्य राखीव दलाचे जवानही बंदोबस्तासाठी तैनात ठेवले जाणार आहे. वसमत शहरातील ७२ मतदान केंद्रावर एकूण ५९८५५ मतदार मतदान करणार असून यामध्ये ३०००२ पुरुष तर २९८५३ महिला मतदारांचा समावेश आहे. एका मतदाराला नगराध्यक्षपदासाठी एक तर दोन नगरसेवक पदासाठी दोन असे तीन मतदान करावे लागणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. तसेच दिव्यांग, वृध्द तसेच गरोदर महिला मतदारांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही. त्यांना थेट मतदान करता येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर