ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही:RTO अधिकाऱ्यांमध्ये फोनवरुन खडाजंगी, ऑडिओ क्लिप व्हायरल

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर आरटीओ विभागातील दोन अधिकाऱ्यांमधील फोनवरील वादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. वैजापूर परिसरात वाहन तपासणी आणि दंडात्मक कारवाई करण्याच्या अधिकारावरून आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये फोनवर तीव्र वाद झाल्याचे या कथित ऑडिओत ऐकायला मिळत आहे. हद्दीच्या नावाखाली सुरू असलेल्या कारवायांवर प्रश्न उपस्थित करत एका अधिकाऱ्याने, “ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही,” असे म्हणत नाराजी केली. या संभाषणात एका निलंबित मोटार वाहन निरीक्षकाच्या सांगण्यावरून बाहेरील भरारी पथक वैजापूर हद्दीत जाऊन कथित वसुली करत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याने वरिष्ठांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे आरटीओ विभागातील अंतर्गत संघर्ष, अधिकारक्षेत्राचा वाद आणि कथित वसुलीचे आरोप चर्चेत आले आहेत. दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.. राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर