ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मुंबई वाचवण्याची ही शेवटची संधी:आमिषाला बळी न पडता BMC निवडणुकीला सामोरे जा, राज ठाकरेंचा मनसे उमेदवारांना कानमंत्र

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या उमेदवारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता मुंबई महापालिकेचा किल्ला अर्थात निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स येतील. पैशांचेही आमिष दाखवले जाईल. पण त्याला बळी पडू नका. आपल्याला मुंबई वाचवायची आहे. ती वाचवण्याची ही शेवटची संधी आहे. मलाही ऑफर्स आल्या होत्या, पण मी त्या पळवून लावल्या. तुम्हीही तसेच करा, असे ते म्हणालेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज मनसेच्या 53 उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी त्यांना मुंबई महापालिकेचा किल्ला कोणत्याही आमिषाला बळी न पडता लढवण्याचा सल्ला दिला. राज ठाकरे म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स येतील. पैशांचेही आमिष दाखवले जाईल. पण तुम्ही त्याला बळी पडू नका. आपल्याला मुंबई वाचवायची आहे. मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि ती वाचवण्यासाठी ही शेवटची संधी आहे. बोगस मतदार आढळला तर फटकवा राज ठाकरे यांनी यावेळी आपल्या उमेदवारांना मतदानाच्या दिवशी बोगस मतदान टाळण्यासाठी सतर्क राहण्याचेही आवाहन केले. मतदानाच्या दिवशी सत्ताधारी पक्षांकडून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तो तुम्ही हाणून पाडा. मतदानाच्या दिवशी प्रत्येक बुथवर आपली 10 माणसे उभी करा. बोगस मतदान होणार नाही याची काळजी घ्या. सतर्क राहा. मतदान केंद्रावर एखादा बोगस मतदार आढळला तर त्याला जागीच फटकवून काढा. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा, असे ते म्हणाले. मलाही खूप ऑफर आल्या होत्या, पण मी सगळ्यांना पळवून लावले, असेही ते यावेळी म्हणाले. राज ठाकरे यांच्या या आदेशानंतर मुंबईतील वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. राज व उद्धव ठाकरेंच्या होणार संयुक्त सभा उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी युती केली आहे. त्यात मनसे 53 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आता ठाकरे बंधूंकडून 4 तारखेला मुंबईचा वचननामा जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर उद्धव व राज ठाकरे यांच्या मुंबई व लगतच्या परिसरात संयुक्त सभा होणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याविषयी बोलताना सांगितले, ठाकरे बंधूंच्या युतीचा वचननामा 4 जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल. सध्या या वचननाम्यावर दोन्ही पक्षांकडून शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या मुंबईसह एमएमआर परिसरात संयुक्त सभा होतील. पूर्व व पश्चिम उपनगरांम्ध्येही या सभा होतील. त्यानंतर शिवतीर्थावर संयुक्त सभा होईल. मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण व डोंबिवली आणि नाशिक येथेही ठाकरे बंधूंच्या जोरदार सभा होतील. आदित्य ठाकरे व अमित ठाकरे या वचननाम्यावर काम करत आहेत, असे ते म्हणाले. खाली वाचा मनसेच्या उमेदवारांची यादी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर