ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसावर हल्ला:हिंगोलीच्या कमलानगर भागातील घटना, उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली शहरातील कमलानगर भागात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर दहा ते बारा जणांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी ता. १ पहाटे घडली आहे. जखमी पोलिस कर्मचाऱ्यास उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हिंगोली शहरासह जिल्हाभरात थर्टीफर्स्ट निमित्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या शिवाय शहरी भागात बिटमार्शल मार्फत गस्त घातली जात होती. हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी देखील गस्तीवर होते. दरम्यान, मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास कमलानगर भागात विनोद गोरे व भुषण खिल्लारे यांच्या दोन गटात वाद सुरु असून हाणामारी होत असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून जमादार संजय डोंगरदिवे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिस आल्याचे लक्षात आल्यानंतर काही जणांनी तेथून पळ काढला. मात्र त्या ठिकाणी दोघे जण गंभीर जखमी असल्याने जमादार डोंगरदिवे यांनी वाहन बोलावून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. दोन्ही गटातील वाद सोडवित असतांना १० ते १२ जणांच्या टोळक्याने डोंगरदिवे यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्यामुळे त्यांना प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही. यावेळी झालेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक निलभ रोहन, पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, शंकर ठोंबरे, गणेश लेकुळे, संतोष करे, संजय मार्के, महम्मद शेख, अजमद शेख यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर टोळके पळून गेले. या मारहाणीत जखमी झालेल्या जमादार डोंगरदिवे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर