ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

नाराज कार्यकर्त्यांकडून इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला:हल्ल्यानंतर पोलिसांचा लाठीचार्ज; उमेदवारी न मिळाल्याचा राग अनावर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एमआयएम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलील यांच्या वाहनावर संतप्त कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. काही वेळातच मोठा जमाव जमा झाला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र वाहनाचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर इम्तियाज जलील हे थेट जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली आहे. या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थितीचा आणि संबंधित व्यक्तींचा तपास सुरू आहे. पक्षांतर्गत उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीचे पडसाद रस्त्यावर उमटल्याने, आगामी काळात या प्रकरणाचे राजकीय परिणाम काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धावत्या वाहनातून बाहेर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न प्रचार रॅलीदरम्यान बायजीपुरा-जिन्सी परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नाराज कार्यकर्त्यांच्या एका गटाने इम्तियाज जलील यांच्या धावत्या वाहनाचा पाठलाग करत त्यांना बाहेर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेपूर्वी काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला होता. परिस्थिती चिघळत चालल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी तातडीने बंदोबस्त वाढवण्यात आला या घटनेवेळी इम्तियाज जलील हे वाहनाच्या पुढील सीटवर बसले होते, तर त्यांच्या गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या एका व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. सुदैवाने, इम्तियाज जलील यांना कोणतीही शारीरिक इजा झाली नाही. मात्र, धावत्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून घटनास्थळी तातडीने बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिसरात कडक नजर ठेवण्यात येत आहे. 22 विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्या चेहऱ्यांना संधी विशेष म्हणजे हा हल्ला बाहेरील विरोधकांकडून नव्हे, तर एमआयएम पक्षातीलच नाराज गटाकडून झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. एमआयएमने यावेळी संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत 22 विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या निर्णयामुळे पक्षात आधीपासूनच असंतोष होता. अनेक ठिकाणी नाराजी उघडपणे व्यक्त करण्यात आली होती. या असंतोषाचेच पडसाद आता रस्त्यावर उतरल्याचे चित्र बायजीपुरा परिसरात पाहायला मिळाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर