ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

तुषार आपटेचे भर चौकात मुंडके छाटा अन् अर्पण करा:कालीचरण महाराजांनी व्यक्त केला संताप; भाजपने दिले आहे स्वीकृत नगरसेवकपद

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपने बदलापूर बलात्कार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक पद दिल्याच्या मुद्यावर कालीचरण महाराजांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तुषार आपटेचे भर चौकात मुंडके छाटा व ते चरणी अर्पण करा, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे या प्रकरणाचा वाद अधिकच तापला आहे. बदलापूर येथील एका शाळेत काही महिन्यांपूर्वी 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणी शाळेतील स्वच्छता कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचे राज्यभरात विशेषतः बदलापुरात तीव्र पडसाद उमटले होते. स्थानिकांनी या घटनेविरोधात तीव्र निदर्शने करत रस्ते व रेल्वे वाहतूक रोखून धरली होती. यामुळे बदलापूर येथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी अक्षय शिंदेसह तुषार आपटेवर गुन्हा दाखल केला होता. पण आता भाजपने या आपटेलाच कुळगाव बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पद बहाल केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. तुषार आपटेचे मुंडके छाटून अर्पण करा या पार्श्वभूमीवर कालीचरण महाराजांनी तुषार आपटेचे शिरकान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुषार आपटेला भर चौकात उभे करून त्याचे मुंडे छाटले पाहिजे. त्यानंतर ते कालीचरण महाराजांना अर्पण केले पाहिजे. आरोप सिद्ध होत असतील तर कारवाई झालीच पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मतदारांना महापालिका निवडणुकीत धर्माचे रक्षण करणाऱ्यांच्या मागे उभे राहण्याचेही आवाहन केले. आमचा उद्देश धर्म राज्याचा आहे. जो हिंदू हिताचे आचरण करेल, त्याला मतदान करा. दोन उमेदवार हिंदू हिताचे असतील तर जो सर्वाधिक हिंदू आचरण करेल त्याला मतदान करा. लोकांनी आपापल्या अनुभवावर उमेदवारांना निवडून द्यावे. हिंदूंचे विभाजन होता कामा नये. सध्या कोणत्याही देशात हिंदू सुरक्षित नाहीत. ही स्थिती भारतातही होऊ शकते. हिंदूंच्या रक्षणासाठी राजकारणाचे हिंदूकरण करणे महत्त्वाचे आहे. हिंदू व्होटर करणे हा आमचा अजेंडा आहे, असे ते म्हणाले. कोण आहेत कालीचरण महाराज? 53 वर्षीय कालीचरण महाराज मूळचे अकोल्याचे आहेत. भावसार समाजाचे असलेल्या कालीचरण महाराजांचे खरे नाव अभिजीत धनंजय सरग असे आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या महाराजांच्या वडिलांचे अकोल्याच्या जयन चौकात मेडिकलचे दुकान आहे. त्यांचे शिक्षण फक्त आठवीपर्यंत झाले. त्यांना ओळखणारे सांगतात की, त्यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नसले तरी त्यांनी अनेक धार्मिक शास्त्रांचा अभ्यास केला आहे. कालीचरण महाराजांच्या वडिलांनी आर्थिक तंगीमुळे त्यांना बालपणी त्यांच्या मावशीच्या घरी पाठवले. या काळात त्यांची हिंदीवरील कमांड वाढली. इंदूरमध्ये ते भय्यूजी महाराजांच्या संपर्कात आले. येथूनच त्यांच्या नावाला महाराज हा शब्द चिकटला. ते आपले केस नेहमी मोकळे ठेवतात. कपाळावर मोठी लाल टिकली लावतात. ते सहसा लाल कपडे घालतात. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. 2017 च्या अकोला नगरपालिका निवडणुकीत त्यांनी आपेल नशीब आजमावले. पण त्यांचा पराभव झाला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर