ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

जनआक्रोशाला अखेर यश:भाजपची नामुष्की टाळण्यासाठी आणि वरिष्ठांकडून स्पष्ट संदेश मिळाल्यानंतर तुषार आपटेंचा राजीनामा, बदलापूरमध्ये खळबळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे आधीच संवेदनशील बनलेल्या राजकीय वातावरणात मोठी घडामोड घडली आहे. या गंभीर प्रकरणातील सहआरोपी आणि बदलापूर-कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनंतर आपटे यांनी स्वखुशीने राजीनामा सादर केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या एका दिवसापूर्वीच त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे या राजीनाम्यामुळे बदलापूरसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवरील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणात तुषार आपटे हे सहआरोपी असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. असे असतानाही त्यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सामाजिक संघटना, पालकवर्ग तसेच विविध राजकीय पक्षांनी या नियुक्तीवर आक्षेप घेत संताप व्यक्त केला होता. आरोपी असलेल्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून मान्यता देणे म्हणजे पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. तुषार आपटे यांची नियुक्ती कालच कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत जाहीर करण्यात आली होती. मात्र नियुक्ती होताच काही तासांतच विरोधकांकडून आणि नागरिकांकडून तीव्र आंदोलनाची भाषा सुरू झाली. भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप होत होता आणि आपटेंची तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर पक्षावर वाढता दबाव लक्षात घेता अखेर आपटेंनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पक्षाची बदनामी होत असल्याची जाणीव झाल्यानंतर आणि वरिष्ठांकडून स्पष्ट संदेश मिळाल्यानंतर तुषार आपटे यांनी स्वतःहून स्वीकृत नगरसेवकपद सोडले. त्यांनी आपला राजीनामा अधिकृतरीत्या सादर करत पदाचा त्याग केल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे भाजपने वाढता राजकीय व सामाजिक दबाव काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. मात्र, या प्रकरणामुळे भाजपच्या निर्णयक्षमतेवर आणि नैतिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे चित्र आहे. राजीनामापत्रातील मजकूरही समोर तुषार आपटे यांनी सादर केलेल्या राजीनामापत्रातील मजकूरही समोर आला आहे. राजीनाम्यात त्यांनी नमूद केले आहे की, महोदय, मी विनंतीपूर्वक अर्ज करतो की, माझी कुळगाव बदलापूर नगरपरिषद स्वीकृत सदस्य / नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मी आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी या पदाचा स्वखुशीने राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती.” या मजकुरावरून त्यांनी कोणताही प्रतिवाद न करता पदत्याग केल्याचे स्पष्ट होते. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून आपटे जामिनावर बाहेर दरम्यान, तुषार आपटे यांचा राजीनामा जरी स्वीकारण्यात आला असला, तरी बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून आपटे जामिनावर बाहेर आहेत. राजीनाम्यानंतरही या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे. या घटनेमुळे राजकारणात नैतिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये पक्षांनी अधिक जबाबदारीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर