ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अज्ञात प्राणी आईच्या कुशीतील चिमुकलीला घेऊन पसार:शरीराचे लचके तोडत छातीसह खाल्ले दोन्ही हात; नागपुरातील भयंकर घटना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एका अज्ञात प्राण्याने आईच्या कुशीत झोपलेल्या एका 6 महिन्यांच्या चिमुकलीला उचलून नेऊन तिला ठार मारल्याची भयंकर घटना नागपूरच्या नरसाळा भागात घडली आहे. या घटनेत प्राण्याने चिमुकलीच्या छातीसह दोन्ही हात खाल्लेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, हुडकेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील नरसाळा परिसरात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथील स्मशानभूमी लगतच्या नाल्याच्या मागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीत अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात अवघ्या 6-7 महिन्यांच्या एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. अनुष्का रवी मेळा असे मृत मुलीचे नाव आहे. ती मध्य प्रदेशातील सेलमिया गावची रहिवासी होती. ठेकेदाराच्या कामासाठी तिचे कुटुंब नागपुरात आले होते. ते सध्या नरसाळा परिसरातील झोपडपट्टीत वास्तव्यास होते. मध्यरात्री 2 च्या सुमारास घडली घटना अनुष्का शुक्रवारी रात्री आपल्या आईच्या कुशीत झोपली होती. मध्यरात्री केव्हातरी एका अज्ञात प्राण्याने तिला तेथून अलगद उचलून नेले. काही वेळाने मध्यरात्री 2 च्या सुमारास तिच्या आईला जाग आली असता त्यांना अनुष्का दिसली नाही. त्यामुळे त्यांनी व कुटुंबीयांनी तिचा शोधाशोध सुरू केला. रडारड सुरू केली. हा आवाज ऐकूण शेजारी गोळा झाले. त्या सर्वांनी अनुष्काचा शोध घेतला असता झोपडपट्टीलगतच तिचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. छात व दोन्ही हात खाल्ले स्थानिकांच्या माहितीनुसार, अज्ञात प्राणाने अनुष्काच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले आहेत. तिची छाती व दोन्ही हात खाल्लेत. या परिसरात रात्रीच्या वेळी रस्त्यावर दिवे नाहीत. त्यामुळे अंधाराचा फायदा घेत ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पण हा हल्ला करणारा प्राणी नेमका कोणता होता? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. विशेषतः रोजीरोटीसाठी बाहेर गावाहून आलेल्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही यामुळे गंभीर बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. वनविभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. हे ही वाचा… भाजपने मुंबईसाठी कंबर कसली:परप्रांतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्टार प्रचारकांची रणनीती; वाचा कुणावर जबाबदारी? भाजपने मुंबई महापालिकेचा गड जिंकण्यासाठी उत्तर भारतीयांची मने जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचारात हिंदी भाषिक स्टार प्रचारकांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार व गायिका मैथिली ठाकूर, मनोज तिवारी यांच्यासह अनेकांचा समावेश असणार आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर