ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

संभाजीनगरात दुय्यम निबंधक कार्यालयात राडा‎:अधिकारी वेळेवर न आल्याने रजिस्ट्रारच्या खुर्चीवर खासगी व्यक्ती, दिवसभर‎ हायटेन्शन ड्रामा, 500 नागरिक ताटकळले‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 2 मध्ये ‎मंगळवारी सकाळी एका खासगी व्यक्तीने चक्क‎ कार्यालयाचा ताबा घेऊन निबंधकांच्या खुर्चीवर‎बसण्याचा धक्कादायक प्रकार घडला. अबुलाला‎ हाश्मी असे या व्यक्तीचे नाव असून, त्याने अधिकारी‎ वेळेवर येत नाहीत, त्यामुळे “जनतेने मला नियुक्त केले‎ आहे” असे म्हणत शासकीय कागदपत्रे हाताळली. या‎प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे खडबडून‎ जागे होत प्रशासनाने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल‎केला. या प्रकारामुळे दिवसभर कार्यालय बंद राहिले.‎रजिस्ट्रीसाठी आलेल्या जवळपास पाचशे नागरिकांना‎ ताटकळत बसावे लागले.‎ मंगळवारी सकाळी 10:30 वाजेपर्यंत दुय्यम निबंधक‎ राजेश राठोड कार्यालयात हजर झाले नव्हते. अधिकारी ‎नसल्याने नागरिक ताटकळत उभे होते. याचा फायदा‎ घेत अबुलाला हाश्मी याने कार्यालयात हस्तक्षेप केला.‎”अधिकारी वेळेवर येत नाहीत. आता मीच कारभार‎ करणार,” असे म्हणत तो मुख्य खुर्चीवर बसला. त्याने‎समोर असलेले शासकीय दस्तऐवज हाताळले. सर्वांचे‎दस्त नोंदवले जातील, असे उपस्थितांना जाहीर केले.‎ 15 – 20 मिनिटांच्या या ”हायव्होल्टेज ड्रामा” चा‎ व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. हा‎ व्हिडिओ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यापर्यंत ‎पोहोचताच त्यांनी सहजिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे‎ यांची कानउघाडणी केली.‎ नोंदणी कार्यालये बंदमुळे कोट्यवधींचा‎महसूल बुडाला, नागरिकांनाही मनस्ताप‎ या घटनेनंतर सिटी चौक पोलिस ठाण्यात हाश्मी आणि त्याच्या‎ 10 ते 15 साथीदारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा‎ आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या‎ घटनेच्या निषेधार्थ तक्रार देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी ‎पोलिस ठाण्यात गेल्याने तिन्ही नोंदणी कार्यालये बंद ठेवण्यात‎ आली. यामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी‎ तारांबळ उडाली. दिवसभरातील सुमारे 1 ते 1.5 कोटी रुपयांचा ‎महसूल बुडाला आहे.‎ दलाल आणि ब्लॅकमेलिंगची चर्चा‎ या निमित्ताने नोंदणी विभागातील “अर्थपूर्ण”‎ साखळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.‎कार्यालयातील काही कर्मचारीच खासगी‎व्यक्तींना गोपनीय माहिती देऊन अधिकाऱ्यांना‎ ब्लॅकमेल करण्यास मदत करतात, अशी चर्चा‎ सुरू आहे. हा आरोपीही एजंट असून‎ त्याच्याकडूनच अधिकारी पैसे घेत असल्याने ‎त्याची हिंमत वाढल्याचीही चर्चा दिवसभर सुरू‎ होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर