ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अलर्ट:हॉल तिकिट वाटपाला सुरुवात, हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांची सही नाही? तर परीक्षेला मुकण्याचा धोका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षांबाबत महत्त्वाची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. मंडळाच्या निर्णयानुसार, यंदाच्या शैक्षणिक वर्षातील बारावीच्या लेखी परीक्षेला 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात होणार असून या परीक्षा 18 मार्च 2026 पर्यंत चालणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिटांचे वाटप सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हॉल तिकिटांची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र, केवळ ऑनलाईन डाउनलोड केलेले हॉल तिकिट ग्राह्य धरले जाणार नसून, संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट काढून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंडळाने सर्व महाविद्यालयांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, विद्यार्थ्यांकडून हॉल तिकिटाच्या प्रिंटसाठी कोणतेही शुल्क आकारू नये. हॉल तिकिट वाटप पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय आपले हॉल तिकिट वेळेत मिळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हॉल तिकिटाबाबत मंडळाने आणखी एक महत्त्वाची अट घातली आहे. विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांची सही आणि अधिकृत शिक्का असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याचा फोटो असलेल्या हॉल तिकिटावर खाली मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का नसल्यास ते हॉल तिकिट अवैध मानले जाईल. अशा परिस्थितीत संबंधित विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला जाऊ शकतो, असा इशाराही मंडळाने दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हॉल तिकिट मिळाल्यानंतर त्यावरील सर्व तपशील नीट तपासून, मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का घेतल्याची खात्री करूनच परीक्षा केंद्रावर जाणे आवश्यक आहे. बारावीची परीक्षा देण्यासाठी हॉल तिकिट हा अत्यावश्यक दस्तऐवज आहे. कोणत्याही परिस्थितीत हॉल तिकिटाशिवाय विद्यार्थ्याला परीक्षेला बसता येणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. यंदाच्या वर्षी राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, लातूर, अमरावती आणि कोकण अशा नऊ विभागांमार्फत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या सर्व विभागांतील महाविद्यालयांनी वेळेत हॉल तिकिट वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षांसोबतच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दहावीच्या परीक्षेची हॉल तिकिटेही लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे दहावीचे विद्यार्थी आणि पालकांनीही हॉल तिकिटाबाबत सजग राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी मंडळाकडून सर्व स्तरांवर तयारी केली जात आहे. दहावीचे 31 आणि बारावीचे 76 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त घेण्यासाठी शिक्षण मंडळाने कठोर पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीचे 31 आणि बारावीचे 76 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईत सर्वाधिक परीक्षा केंद्रांची मान्यता छत्रपती संभाजीनगर विभागातील असल्याची माहिती समोर आली आहे. कॉपी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश मंडळाने दिला आहे. भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली कॉपीमुक्त अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी राज्यभर भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर अचानक तपासण्या, कडक देखरेख आणि नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. याशिवाय, अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, नियमांचे पालन करून शांततेत आणि प्रामाणिकपणे परीक्षा द्याव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर