ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कृष्णराज उगवता सूर्य, त्याला कोणी झाकू शकत नाही:मुलाच्या भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भारतीय जनता पक्षाने आपल्या संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल केले असून, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आणि सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा कृष्णराज महाडिक यांच्याकडे ‘भाजप युवा मोर्चा’च्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आपल्या मुलाच्या निवडीनंतर खासदार धनंजय महाडिक यांनी आनंद व्यक्त केला आहे. कृष्णराज हा उगवता सूर्य आहे, त्याला कोणी झाकू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कृष्णराज महाडिक हे गेल्या काही काळापासून कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय आहेत. विधानसभा आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ते स्वतः रिंगणात उतरण्यास इच्छुक होते. इतकेच नव्हे तर महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, पक्षाच्या आदेशाचा मान राखत त्यांनी दोन्ही वेळी आपली उमेदवारी मागे घेतली होती. त्यांच्या या संयमाची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत पक्षाने आता त्यांच्यावर राज्याच्या युवा नेतृत्वाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. कृष्णराज उगवता सूर्य, कोणी झाकू शकत नाही खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कृष्णराज महाडिक यांच्या निवडीबद्दल विचारण्यात आले. पुत्राच्या या निवडीनंतर खासदार धनंजय महाडिक यांनी समाधान व्यक्त केले आहे. “भाजप हा कार्यकर्त्यावर कधीही अन्याय न करणारा पक्ष आहे. मी पूर्वी म्हणालो होतो की, कृष्णराज हा ‘उगवता सूर्य’ आहे आणि त्याला कोणीही झाकू शकणार नाही. आज खऱ्या अर्थाने त्या वाक्याची पहाट झाली आहे. आता कृष्णराज संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना पक्षाशी जोडण्याचे काम प्रभावीपणे करेल,” अशा शब्दांत धनंजय महाडिक यांनी आनंद व्यक्त केला. कोण आहेत कृष्णराज महाडिक? राजकीय वारसा लाभलेले कृष्णराज महाडिक यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. ते एक लोकप्रिय यू-ट्युब व्लॉगर असून त्यांच्या चॅनलचे ७ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. तरुणांमध्ये त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. कृष्णराज महाडिक हे यू-ट्युब व्लॉगर सोबतच आंतरराष्ट्रीय कार रेसर देखील आहेत. त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी राष्ट्रीय गो-कार्टिंग चॅम्पियनशिप जिंकली होती. तसेच २०१२ आणि २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय रोटॅक्स मॅक्स वर्ल्ड ग्रँड फायनलमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भाजपची नवीन कार्यकारिणीची संपूर्ण यादी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर