ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

राज्यसभेच्या 7 जागांसाठी आठवले निश्चित, उर्वरित तीनवर तगडी स्पर्धा:वर्षा बंगल्यावर मॅरेथॉन बैठक; अंतिम यादीसाठी दिल्लीकडे मोर्चा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे सहा दिवस उरले असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या कोट्यातील चार जागांसाठी नावे ठरवण्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला रविंद्र चव्हाण यांच्यासह सुमारे 12 प्रमुख नेते उपस्थित होते. राज्यातील संख्याबळ आणि सहयोगी पक्षांचा विचार करून संभाव्य उमेदवारांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. तसेच विजया रहाटकर यांचे नावही जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत ऐनवेळी दोन नवी नावे पुढे आली. त्यात ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांचा समावेश आहे. या घडामोडींमुळे चार जागांपैकी तीनसाठी चुरस वाढली आहे. आठवले यांचे नाव निश्चित मानले जात असले, तरी उर्वरित तीन जागांवर तावडे, रहाटकर, दानवे आणि कराड यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम निर्णयासाठी पुढील पाऊल दिल्लीकडे वळणार आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण लवकरच दिल्लीला जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार असल्याचे समजते. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करूनच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत भाजपच्या राज्यसभा उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीच्या संख्याबळाचा विचार करता सातपैकी सहा जागांवर विजयाची गणिते त्यांच्या बाजूने असल्याचा पक्षाचा दावा आहे. मविआतून शरद पवार यांच्या नावाची चर्चा दरम्यान, महाविकास आघाडीच्या गोटातही हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आज विधानभवनात मविआ आमदारांची बैठक होणार आहे. ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे हे राज्यसभेची एक जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. दुसरीकडे मविआतून राज्यसभेसाठी शरद पवार यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र ते सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने ते निवडणूक लढवतील की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सातपैकी सहा जागा महायुतीकडे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून वेळ मागण्यात आला आहे. विधानसभेतील विद्यमान संख्याबळानुसार सातपैकी सहा जागा महायुतीकडे जाण्याची शक्यता असून, एक जागा महाविकास आघाडीकडे जाऊ शकते. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये उमेदवारीवरून ताण वाढला आहे. पुढील काही दिवसांत नावांची घोषणा होताच राज्यसभेच्या लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर