ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

परभणीकरांनी सुरेश वरपुडकरांची घराणेशाही नाकारली:कुटुंबातील 5 पैकी 4 उमेदवारांचा दारुण पराभव; केवळ पुतण्यावर विजयाचा गुलाल

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदारांनी राजकारण्यांची थोपली जाणारी घराणेशाही नाकारली आहे. परभणी जिल्ह्यातील निवडणुकीत मतदारांनी भाजप नेते तथा माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील 5 पैकी 4 उमेदवारांचा पराभव करून वरपुडकरांना जोरदार झटका दिला आहे. या निवडणुकीत वरपुडकर यांच्या केवळ एका पुतण्याचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यासंबंधीच्या माहितीनुसार, सुरेश वरपुडकर यांच्या कन्या सोनल देशमुख ह्या झरी जिल्हा परिषद गटातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांचा भजाप उमेदवार दिलीप देशमुख यांनी पराभव केला. वरपुडकरांचे चिरंजीव समशेर वरपुडकर हे शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून उभे होते. त्यांचाही ठाकरे गटाच्या पांडुरंग खिल्लारे यांनी पराभव केला. सुरेश वरपुडकर यांच्या स्नुषा प्रेरणा वरपुडकर या ही दैठणा जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. त्यांचा काँग्रेस उमेदवार ज्योत्स्ना गणेश घाडगे यांनी पराभव केला. दुसरीकडे, लोहगाव जिल्हा परिषद गटात सुरेश वरपुडकरांचे 2 पुतणे निवडणूक लढवत होते. त्यातील काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या अजित वरपुडकर यांचा विजय झाला. त्यांनी भाजपचे आपले प्रतिस्पर्धी उमेदवार ऐश्वर्य वरपुडकर यांचा पराभव केला. यामुळे सुरेश वरपुडकर यांना मोठा दिलासा. पण त्यांच्या कुटुंबातील 5 पैकी 4 जणांना पराभवाची चव चाखावी लागल्यामुळे परभणीच्या मतदारांनी त्यांची घराणेशाही नाकारल्याचे चित्र आहे. सुरेश वरपुडकरांना राजकीय धक्का कुटुंबातील 4 उमेदवारांचा पराभव झाल्यामुळे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांना चांगलाच धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुरेश वरपूडकर यांच्या पत्नीचा विजय झाला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही त्यांनी आपल्या घरातील अधिकाधिक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्या या प्रयत्नाला आता अपयश आले आहे मतदार घराणेशाही नाकारत असल्याचे चित्र उल्लेखनीय बाब म्हणजे नगरपालिका निवडणुकीत लोहगाव नगरपालिकेत एकाच घरातील पाच जणांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्या पाचही जणांचा पराभव झाला होता ही बातमी राज्यभर चर्चिली गेली होती. त्यानंतर परभणीमध्येही असाच प्रकार माजी मंत्र्याने केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा मतदारांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. यामुळे मतदार राजा हा घराणेशाहीला नाकारत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर