ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला:CM देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना; राज्यात तीन दिवसाचा दुखावटा जाहीर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनावर भावना व्यक्त केल्या आहेत. ज्याच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अजित दादा हे अतिशय संघर्षातून तयार झालेले अशा प्रकारचे नेतृत्व होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस अतिशय कठीण दिवस आहे. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात, असे देखील फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान अजित पवार देत होते. अशा काळामध्ये त्यांचे निघून जाणे हे अविश्वसनीय आहे. मनाला चटका लावणारे आहे. वैक्तिगत माझ्याकरता एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र मला सोडून गेलेला आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व लवकरच बारामतीकडे रवाना होत आहे. सकाळपासूनच मी सर्वांच्या संपर्कात आहे. माननीय प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या सर्व परिस्थितीची कल्पना दिलेली आहे. त्यांनी याबद्दल प्रचंड दुःख व्यक्त केलेले आहे. राज्यात तीन दिवसाचा दुखावटा जाहीर संपूर्ण देशातच या सर्व प्रकरणामुळे हळहळ पसरली आहे. अजित पवार यांच्या कुटुंबाशी चर्चा करून पुढच्या सर्व गोष्टी ठरविण्यात येतील. सकाळी सुप्रिया सुळे यांच्याशी बोलणं झालं आहे. तसेच पार्थ पवार यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. बारामती मध्ये शासकीय सुट्टी घोषित करण्यात आली आहे. तसेच राज्यात तीन दिवसाचा दुखावटा जाहीर करण्यात आलेला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विश्वास ठेवायलाच मन तयारच नाही कधीही भरून न निघणारे नुकसान महाराष्ट्राचे झाले आहे. अशा प्रकारचे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी निर्माण होते, ती भरुण काढणे कठीण आहे. अतिशय संघर्षाच्या काळात आम्ही सोबत काम केलेले आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयारच होत नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर