ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

राजकीय अस्वस्थतेच्या चर्चांना पूर्णविराम!:शरद पवारांनी आमदार रोहित पवारांवर सोपवली ‘रयत’च्या उत्तर विभागीय अध्यक्षपदाची धुरा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडी आणि नेत्यांच्या गाठीभेटींमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असतानाच, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर एक मोठी शैक्षणिक व सामाजिक जबाबदारी सोपवली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या आशियातील सर्वात मोठ्या ‘रयत शिक्षण संस्थे’च्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या 6 वर्षांपासून ते संस्थेवर सदस्य म्हणून कार्यरत होते. अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने रोहित पवार नाराज असल्याच्या आणि पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याच्या वावड्या उठल्या होत्या; मात्र थेट विभागीय अध्यक्षपद देऊन शरद पवारांनी रोहित पवारांवर असलेला आपला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. माझ्या कामाची ही पोचपावती- रोहित पवार या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल आनंद व्यक्त करत आमदार रोहित पवारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. बहुजन समाजाच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्थापन झालेल्या ‘रयत’च्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आदरणीय पवार साहेब आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार! गेली सहा वर्षे सदस्य म्हणून सर्वांना सोबत घेऊन केलेल्या कामाची ही पोचपावतीच आहे. भविष्यातही कर्मवीर अण्णांच्या विचारांवर चालताना आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
बारामतीत ‘रोहित पवार’ ॲक्टिव्ह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे सध्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात कमालीचे सक्रिय झाले आहेत. त्यांच्या या वाढत्या सक्रियतेचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आज बारामतीत पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार यांनी आज बारामतीमध्ये एका भव्य ‘जनता दरबारा’चे आयोजन केले आहे. बारामतीमधील शारदनगर येथील प्रतिष्ठित ‘आप्पासाहेब पवार सभागृहात’ हा कार्यक्रम पार पडत असून, या माध्यमातून ते बारामतीकरांशी थेट संवाद साधून त्यांच्या स्थानिक समस्या जाणून घेत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. रोहित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. त्यातच आज त्यांनी थेट जनता दरबार घेतल्यामुळे, बारामतीचा पुढचा दादा कोण? हे ठरवण्यासाठी आणखी एका ‘दादा’ची बारामतीत भर पडत आहे का, अशी जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे. ‘रयत’ ग्लोबल होणार! दुसरीकडे, सन 2026 ते 2029 या पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ‘रयत शिक्षण संस्थे’च्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली. या पदासाठी केवळ त्यांचाच एकमेव अर्ज आल्याने ही निवड निश्चित झाली. काही दिवसांपूर्वीच अध्यक्षपदाची धुरा पुन्हा हाती घेताच शरद पवारांनी संस्थेचा चेहरामोहरा बदलणारे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देणारे अनेक महत्त्वाचे संकल्प जाहीर केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर