ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

पुण्यात उद्यापासून जमावबंदी:पुढील 14 दिवस 5 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही; मोर्चे, आंदोलने, सभांवर कडक निर्बंध

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून विविध राजकीय व सामाजिक संघटना आक्रमक होत असताना आता पुणे प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उद्यापासून म्हणजे मंगळवारपासून पुढील 14 दिवस शहरात जमावबंदीचे आदेश जारी केलेत. या काळात शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, मिरवणुका व सभा घेण्यास साफ मनाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 च्या कलम 37(1)(2)(3) अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. आगामी बकरी ईद व इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात अलर्टही जारी करण्यात आला आहे. काय आहे पोलिसांच्या आदेशात? मोर्चे आणि सभांना बंदी – पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे, सार्वजनिक ठिकाणी सभा घेणे, मोर्चे किंवा मिरवणुका काढणे यावर पूर्णपणे बंदी असेल. शस्त्रे आणि घातक वस्तू बाळगण्यास मनाई – तलवार, भाला, लाठी, काठी, बंदूक किंवा शारीरिक इजा करू शकेल अशी कोणतीही वस्तू सार्वजनिक ठिकाणी सोबत बाळगण्यास बंदी असेल. ज्वलनशील पदार्थांवर बंदी – दगड गोळा करणे, क्षेपणास्त्रे किंवा अस्त्रे तयार करणे, तसेच कोणतेही दाहक, स्फोटक आणि ज्वलनशील द्रव पदार्थ सोबत नेण्यावर निर्बंध असतील. आक्षेपार्ह घोषणा आणि प्रतिमा दहन – सार्वजनिक शांतता भंग करू शकतील अशा अर्वाच्च घोषणा देणे, चिथावणीखोर गाणी किंवा वाद्ये वाजवणे यावर बंदी असेल. तसेच कोणत्याही नेत्याच्या किंवा व्यक्तीच्या चित्राचे/प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यास मनाई आहे. आक्षेपार्ह फलक – शिष्टाचाराच्या विरोधात असणारे चित्रे, चिन्हे, फलक वापरण्यावर कडक कारवाई केली जाईल. कारवाईचा इशारा – जर एखाद्या व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन करून शस्त्र किंवा धोकादायक वस्तू बाळगल्या, तर पोलीस त्या वस्तू जप्त करतील आणि संबंधित व्यक्तीवर तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल. महापालिकेचीही इंधन बचतीसाठी उपाययोजना दुसरीकडे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनीही विविध विभागांकडून वाहनांचा होत असलेला अवाजवी वापर, अनावश्यक प्रवास व वाढता इंधन खर्च लक्षात घेता सर्व विभागप्रमुखांना इंधन बचतीबाबत तातडीचे आदेश दिलेत. महापालिकेच्या वाहनांचा वापर अत्यावश्यक कामांसाठीच करावा, प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे त्यांनी म्हटले आहे. महापालिकेच्या आदेशात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना आवाहन केले आहे. ज्यामध्ये सद्यस्थितीत पेट्रोलियमचे प्रती बॅरल दर वाढलेले असल्याने इंधन वापराबाबत काटकसर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे मनपा अधिकारी/कर्मचारी यांचेकरीता खालीलप्रमाणे उपाययोजना प्रस्तावित करण्यात येत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर