ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत:देवगिरीवर मध्यरात्री खलबते, चाकणकरांच्या जागी वैशाली नागवडेंची वर्णी लागणार?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबईतील ‘देवगिरी’ या सरकारी निवासस्थानी रविवारी मध्यरात्री पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली रिक्त पदे भरणे आणि आगामी रणनीती आखण्यावर खलबते झाली. या बैठकीत सर्वात मोठी चर्चा रंगली ती वादग्रस्त प्रकरणानंतर बाजूला झालेल्या रुपाली चाकणकर यांच्या जागेची. महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आता वैशाली नागवडे यांच्याकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या उच्चस्तरीय बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘या’ नावांवर लवकरच शिक्कामोर्तब? मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुका लक्षात घेता तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले आहे. त्यानुसार काही महत्त्वाच्या विंग्सचे नेतृत्व बदलले जाणार असून, काही ठिकाणी जुन्याच चेहऱ्यांवर विश्वास दाखवला जाणार आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे, विद्यार्थी अध्यक्षपदी आकाश झांबरे, युवक अध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर नव्या नेतृत्वाची गरज नाशिकमधील वादग्रस्त भोंदू अशोक खरात याच्याशी कथित वैयक्तिक संबंध असल्याच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. या प्रकरणाचे थेट शिंतोडे पक्षावर उडाल्यामुळे अखेर मार्च महिन्यात रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या राजकीय भूकंपानंतर चाकणकर या काहीशा अज्ञातवासात गेल्या आहेत. मात्र, यादरम्यान त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या विविध राजकीय नेत्यांना कायदेशीर नोटिसा पाठवून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. चाकणकर यांच्या एक्झिटमुळे महिला आघाडीत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठीच वैशाली नागवडे यांच्या नावाचा पर्याय पुढे आल्याचे बोलले जात आहे. पक्षाला नवीन बळ मिळणार? मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीतील निर्णयांवर पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब करणार आहे. या संघटनात्मक बदलांमुळे निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण होईल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत या संदर्भातील अधिकृत घोषणा केली जाण्याची चिन्हे आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर